Home /News /entertainment /

VIDEO : तृप्ती देसाईंना देखील 'पुष्पा'चा मोह नाही आवरला ! श्रीवल्ली गाण्यावर नणंदेसोबत थिरकल्या

VIDEO : तृप्ती देसाईंना देखील 'पुष्पा'चा मोह नाही आवरला ! श्रीवल्ली गाण्यावर नणंदेसोबत थिरकल्या

सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बास मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) पर्वातील स्पर्धक तृप्ती देसाई ( social activist trupti desai )यांना देखील पुष्पाचा मोह आवरला नाही. मग काय त्यांनी थेट नणंदुबाईंसोबतच श्रीवल्ली गाण्यावर ठेका ठरला.

पुढे वाचा ...
    पुणे, 23 जानेवारी- मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा (Pushpa: The rise)या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील गाणी म्हणू नका की, डायलॉग सगळचं लयभारी आहे. इन्स्टावर तर पुष्पाची एकापेक्षा एक  रील पाहायला मिळत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बास मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) पर्वातील स्पर्धक तृप्ती देसाई ( social activist trupti desai )यांना देखील पुष्पाचा मोह आवरला नाही. मग काय त्यांनी थेट नणंदुबाईंसोबतच श्रीवल्ली गाण्यावर ठेका ठरला. त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तृप्ती देसाई यांनी दोन दिवसापूर्वी श्रीवल्ली गाण्यावरचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र आता त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, श्रीवल्ली डान्स ❤️🙏‌.....मी आणि माझी नणंद सीमा पाटील... असंच काहीतरी 😀😊.. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. एकाने म्हटलं आहे की, ताई की झलक सबसे अलग. तर दुसऱ्याने म्हटलंय की, एकच नंबर ताई! नेटकऱ्यांना त्यांचा हा डान्स मात्र आवडलेला आहे. बिग बॉस मराठीच्या घऱात देखील तृप्ती देसाई सकाळच्यावेली गाण्यावर डान्स करताना दिसायच्या. तृप्ती देसाई 2021 च्या बिग बॉस मराठीच्या सीजन तीनमध्ये दिसल्या. त्यांच्या खेळाचे कौतुक झाले. घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची भेट घेतली. यासोबत कधी मदत लागली तर एक फोन करा असं देखील त्यांनी सांगितलं होते. तिसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. यानंतरच त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. वाचा-बिग बॉस मराठी सीझन 3 फेम मीरा जगन्नाथला चढला PUSHPA चा फिव्हर, पाहा VIDEO तृप्ती देसाई मूळ कोल्हापूरच्या आहेत पण त्यांचं कुटुंब नंतर पुण्यात स्थायिक झालं. पुण्याच्या SNDT महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली. शनिशिंगणापूर पाठोपाठ तृप्ती देसाईंनी मुंबईचा हाजी अली दर्ग्यात, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनं केली. त्यानंतर त्या चर्चेत आल्या.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या