मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Bigg Boss Marathi' च्या घरात सतत भांडणारे जय- विशाल शो संपल्यानंतर दिसले पहिल्यांदा एकत्र!

'Bigg Boss Marathi' च्या घरात सतत भांडणारे जय- विशाल शो संपल्यानंतर दिसले पहिल्यांदा एकत्र!

 बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीजनचा सांगलीचा विशाल निकम महाविजेता ठरला. तर उपविजेता पुण्याचा जय दुधाणे ठरला आहे. शो संपल्यानंतर पहिल्यांदा हे दोघे भेटले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 6 जानेवारी- बिग बॉस मराठीचा  (Bigg Boss Marathi  ) तिसरा सीजन संपून काहीस दिवस झाले आहेत. मात्र प्रेक्षक या शोला व स्पर्धकांना मिस करत आहेत. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीजनचा सांगलीचा विशाल निकम (vishal nikam)  महाविजेता ठरला. तर उपविजेता पुण्याचा जय दुधाणे (jay dudhane ) ठरला आहे. सीजन संपल्यानंतर सर्वांनी पहिल्यांदा घरच्या मंडळींची भेट घेतली. विशाल निकमने देखील शो संपल्यानंतर मुंबईत न थांबता डायरेक्ट गावाला आला. त्यानंतर त्यानं शिवलीला पाटील तसेच विकास पाटील याची भेट घेतली. आता विशाल निकमने जय दुधाणेची भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशाल आणि जयची नेमकी भेट मुंबईत झाली की पुण्यात याबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र या दोघांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिग बॉसच्या घरात या दोघांच्यात म्हणावी अशी मैत्री नव्हती. दोघांचं फारसं पटले देखील नाही. खेळात असं होत असतं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक स्पर्धक एकमेकांना भेटत आहे. यापूर्वी जय दुधाणे याने उत्कर्ष शिंदेची तसेच मीरा जगन्नाथ हिची देखील भेट घेतली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक कलाकारांनी नवीन प्रोजेक्टस मिळाले आहे. सुरेखा कुडची यांना नवी मालिका मिळाली आहे. यासोबतच उत्कर्ष शिंदे कर्लसवर एक शो होस्ट करताना दिसणार आहे. यासोबत जय दुधाणेला घरात होता तेव्हाच महेश मांजरेकर यांनी सिनेमाची ऑफर दिली आहे. बिग बॉसचं घर नाव, प्रसिद्धीसोबत काम देखील देते हे पुन्हा सिद्ध झालं आहे. वाचा-अभिज्ञा भावे जगतेय पुन्हा 'तो' दिवस, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली... बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन आतापर्यंतच्या सर्व सीजनपेक्षा हीट ठरला आहे. आजही प्रेक्षक या शोला मिस करत आहेत. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीचा चौथा सीजन लवकरच भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी अधिकृत माहिती काहीच मिळालेली नाही मात्र सोशल मीडियावर याची चर्चा आहे.
First published:

Tags: Bigg boss marathi, Bigg Boss OTT, Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या