Home /News /entertainment /

Bigg Boss च्या घरात आलेत नवे चार स्पर्धक? दादूस ऑर्केस्ट्रामध्ये येणार वेगळीच रंगत

Bigg Boss च्या घरात आलेत नवे चार स्पर्धक? दादूस ऑर्केस्ट्रामध्ये येणार वेगळीच रंगत

बिग बॉसच्या घरात चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या अनोख्या टास्कनंतर आता नव्या भागात प्रेक्षकांना मनोरंजनाचा जबरदस्त कार्यक्रम 'दादुस ऑर्केस्ट्रा-फॅशन शोभेल तुला!' पाहायला मिळणार आहे.

  मुंबई, 23 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील बहुप्रतिक्षित शो बिग बॉस मराठीचा सीजन 3 सीजन (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. 19 सप्टेंबर रोजी 14 स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. या सीजनमध्ये अनेक प्रसिद्ध चेहेरे, कलाकार स्पर्धक म्हणून आहेत. बिग बॉसच्या घरात चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या अनोख्या टास्कनंतर आता नव्या भागात प्रेक्षकांना मनोरंजनाचा जबरदस्त कार्यक्रम 'दादुस ऑर्केस्ट्रा-फॅशन शोभेल तुला!' पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळाले. हे चार नवे सदस्य घरात आले की काय असं वाटू शकतं. परंतु हा नव्या नाही, तर घरातील त्याच सदस्यांचा धम्माल मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील हे दोघे महिल्यांच्या गेटअपमध्ये, तर सुरेखा कुडची आणि मीनल शाह पुरुषांचा गेटअपमध्ये मनोरंजन करणार आहेत. 'दादुस ऑर्केस्ट्रा-फॅशन शोभेल तुला!' मध्ये विकास पाटील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर मीनल शाहसोबत, तर उत्कर्ष शिंदे आणि सुरेखा कुडची यही पोरगी साजूक तुपातली या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसतील. दोन दिवसांच्या टास्कनंतर आता हा मनोरंजनाचा टास्क प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  Bigg Boss 15 मध्ये दिसणार राखी सावंतचा नवरा! कधीही माध्यमांसमोर न आलेला चेहरा

  100 दिवस एकत्र राहताना स्पर्धकांमध्ये झालेले वाद यापूर्वीच्या सीजनमध्ये चांगलेच गाजले होते. आता नव्या तिसऱ्या सीजनच्या खऱ्या खेळाला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच स्पर्धकांची परीक्षा सुरु होते. पहिल्याच दिवशीपासून या स्पर्धकांना घरात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी विविध टास्क पार करावे लागतात.

  HBD: फक्त 'Bigg Boss'चं नव्हे तर राहुल वैद्यने या कार्यक्रमांतसुद्धा घेतला होता

  'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा हा तिसरा दिवस आहे. आणि ग्रँड प्रीमियरमध्येच होस्ट महेश मांजरेकर यांनी हा पहिला आठवडा महिलांच्या नावावर असणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे महिलांना विशेष हक्क असणार आहेत. तर पुरुष स्पर्धक हे त्यांचे सेवक असणार आहेत. महिला स्पर्धकांनी फक्त त्यांच्या सेवकांना मार्गदर्शन करायचं आणि बाकी सर्व काम पुरुष सेवकाने पार पाडायचं असं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या