'बिग बॉस मराठी 2'च्या बक्षिसाच्या रक्कमेचं काय करणार? शिवनं दिलं हे उत्तर

'बिग बॉस मराठी 2'च्या बक्षिसाच्या रक्कमेचं काय करणार? शिवनं दिलं हे उत्तर

अंतिम फेरीत सर्वांवर मात करत शिवने जेतेपदाची ट्रॉफी आणि १७ लाखांची बक्षिसाची रक्कम जिंकली.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रिअलिटी शो ‘बिग बॉस मराठी 2’च्या विजेतेपदावर शिव ठाकरेनं आपलं नाव कोरलं. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ‘बिग बॉस 2’ च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये शिवच्या नावाची घोषणा करण्यात आली. गेल्या १०० दिवसांपासून बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांपैकी नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. मात्र त्यापैकी शिवने बाजी मारत जेतेपदाची ट्रॉफी आणि १७ लाखांची बक्षिसाची रक्कमही जिंकली. विजेतेपद मिळवल्यानंतर या पैशांचे काय करणार याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवने खुलासा केला.

‘बिग बॉस मराठी 2’चं जेतेपद मिळाल्याचा खूप आनंद झाल्याचं शिवनं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. ‘आजचा दिवस खूपच खास असून मला एखाद्या रिअलिटी शोचं विजेतेपद मिळावं हे माझं स्वप्न आज पूर्ण झालं.’ अशी प्रतिक्रिया शिवनं दिली. बक्षीसाची मिळालेली १७ लाखांची रक्कम आईकडे देणार असल्याचे शिवने सांगितले. मूळचा अमरावतीचा असणाऱ्या शिवने अमरावतीमध्येच काही वर्षांपूर्वी घर घेतलं होतं त्यासाठी घेतलेलं कर्ज या पैशांमध्ये फेडणार असल्याचे त्यानं सांगितलं. शिव म्हणाला, ‘मी काही वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये एक घर घेतले होते. या घरासाठी बँकेकडून कर्ज घेतलेले. बक्षिसाच्या रक्कमेमधून मी ते कर्ज फेडणार आहे.’

सलमान-रानूच्या भेटीनंतर हा VIDEO आला समोर

शिव पुढे म्हणाला, महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची ऑफर दिल्यानं मला खूप जास्त आनंद झाला आहे. मला सुरुवातीपासूनच अभिनय श्रेत्रात करियर करायची इच्छा होती. महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटामध्ये संधी दिली असली तरी मराठीबरोबरच हिंदीमध्येही काम करायला आवडेल. शिव ठाकरे ‘रोडीज’ या रिअलिटी शोमधून चर्चेत आला शिवला होता. तेथे त्याला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती.

22 लाखांना विकलं 1995 च्या चित्रपटाचं पोस्टर, काय आहे खास?

रोडीजच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकला होता. पण ‘बिग बॉस मराठी 2’नं त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो थोडा शांतच राहिला. पण नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहीला. बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान शिवने मिळवला होता. त्यानंतर टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यानं तो वेळोवेळी नॉमिनेशनपासूनही वाचत आला होता.वीणा जगतापसोबतची त्याची मैत्री विशेष चर्चेता विषय ठरली.

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले. किशोरी शहाणे ‘घर मोरे परदेसिया’ गाण्यावर थिरकल्या तर हिना पांचाळने ‘साकी साकी’ आणि अभिजीत बिचुकलेने ‘सारा जमाना’ या गाण्यावर डान्स सादर केला. तसंच अभिजीत केळकर, वैशाली म्हाडे, रुपाली जाधव, माधव देवचके, मैथिली जावकर यांचेही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले.

अक्षय कुमारला भेटण्यासाठी 18 दिवसांत तो चालला 900 किलोमीटरचं अंतर!

==========================================================

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 01:17 PM IST

ताज्या बातम्या