Bigg Boss Marathi 2- सुरेखा पुणेकरांची घरातून एक्झिट

रेखाताई घरातून बाहेर पडताना सगळेच सदस्य भावुक झाले. सगळ्या सदस्यांनी सुरेखाताईना मानाचा मुजरा केला आणि 'ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे,' असं म्हटल.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 09:07 AM IST

Bigg Boss Marathi 2- सुरेखा पुणेकरांची घरातून एक्झिट

मुंबई, 08 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात संपूर्ण आठवडाध्ये अतिथी देवो भव: हा टास्क रंगला आणि ज्यामध्ये बिग बॉस मराठी सिझन १ मधील सदस्य घरामध्ये गेस्ट बनून आले. या टास्कमध्ये नेहाच्या टीमने बाजी मारली. या आठवड्यात सुरेखा पुणेकर यांना कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर जावं लागलं. हिना पांचाळरुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे नॉमिनेशनमध्ये होते. ज्यामध्ये  वैशाली म्हाडे आणि सुरेखा पुणेकर हे डेंजर झोनमध्ये होते. मात्र अखेर महेश मांजरेकरांनी सुरेखा ताईंना घराबाहेर येण्यास सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सुरेखा यांनी घरातील स्पर्धकांची आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

घरातील सदस्यांच्या मनात त्यांच्याविषयी नेहमीच आदर होता आणि राहील. सुरेखाताई घरातून बाहेर पडताना सगळेच सदस्य भावुक झाले. सगळ्या सदस्यांनी सुरेखाताईना मानाचा मुजरा केला आणि 'ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे,' असं म्हटल. सुरेखा ताईंनी घरातल्या सदस्यांना दिलेले नृत्याचे धडेत्यांनी सादर केलेली लावणी, मजा- मस्ती, त्यांनी वेळोवेळी दिलेला आधार सदस्यांना घरामध्ये नक्कीच आठवेल. यावेळी सुरेखा पुणेकरांना त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर व्हिडिओ दाखविण्यात आला. महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला अनसेफ करायचे होते पण त्यांनी असे करण्यास साफ नकार दिला.

आलिया भट्टच्या या खोलीत अजून होतं तरी कोण?

दरम्यान, महेश मांजरेकरांनी एकच फाईट वातावरण टाईट या कार्यातून सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची संधी दिली. यात किशोरी आणि नेहाबद्दल सदस्यांना वाटणाऱ्या गोष्टी, राग इतर सदस्यांनी व्यक्त केला. माधवने वीणा आणि नेहा,बद्दल तर शिवने नेहा आणि हिनाबद्दलचा राग व्यक्त केला. वैशालीनेही आपल्या मनातली किशोरी शहाणे आणि नेहा यांच्याविषयीच्या न आवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. रुपाली आणि वीणाने किशोरी यांचे नाव घेतले आणि त्यामुळे सगळ्याच सदस्यांन आश्चर्याचा धक्का बसला. स्वतः किशोरी यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. तर अभिजीतने नेहा आणि किशोरी शहाणे यांच्याबद्दलच्या न आवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या.

...म्हणून सपना चौधरीने विष घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न

Loading...

आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल... कोण नवाीन कॅप्टन होईल... सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे पाहणे रंजक असणार आहे.

VIDEO : भाजपात दाखल झाल्यानंतर सपना चौधरी म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 8, 2019 09:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...