Bigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री

Bigg Boss Marathi 2- शिवानी सुर्वेची एक्झिट तर हिना पांचाळची ग्रँड एण्ट्री

हिनाच्या घरात येण्याने नवीन काय होणार... ती कोणत्या ग्रुपमध्ये जाणार... तिचा घरातला वावर कसा असेल...

  • Share this:

मुंबई, 16 जून- बिग बॉस मराठी विकेण्डचा डावमध्ये सदस्यांनी आठवडाभर घातलेला गोंधळ, भांडण, टास्क यावर महेश मांजरेकरांनी सगळ्यांचीच शाळा घेतली. बिग बॉस मराठीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेल्या शिवानी सुर्वेने दोन- तीन दिवस जो काही गोंधळ घातला, त्यावर तिलादेखील महेश यांनी कडक शब्दांत समज देत तिला बाहेरच रस्ता दाखवला. आता शिवानीची बिग बॉस मराठीच्या घरातून एक्सिट झाली असली तर एक स्पर्धकाची एण्ट्रीही झाली आहे. हिना पांचाळची घरात पहिली वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली.

हेही वाचा- युवराज सिंग, धोनीबद्दल हा अभिनेता म्हणाला, ‘दुश्मनी गेहरी है...’

हिना उत्कृष्ट नृत्यांगणा, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. महेश मांजरेकरांनी हिनाला फिनालेमध्ये कोण असेल असा प्रश्न विचारला असता हिनाने पराग कान्हेरे आणि अभिजीत बिचुकले तिला स्टेजवर घेऊन आले असल्याचं स्वप्न पडलं असं सांगितलं. यावरून पराग आणि अभिजीत तिच्यासोबत अंतिम फेरीत असतील असं स्पष्ट केलं. तर दिंगबर नाईक, सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे या ग्रँड फिनालेमध्ये मला दिसत नाही असेदेखील तिने सांगितले. आता हिनाच्या घरात येण्याने नवीन काय होणार... ती कोणत्या ग्रुपमध्ये जाणार... तिचा घरातला वावर कसा असेल... प्रेक्षकांची मनं ती जिंकू शकेल का...या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत.

हेही वाचा- प्रकाश राजसोबत सेल्फी काढला म्हणून महिलेच्या पतीने केला अपमान

हिनाच्या घरातील पहिल्या दिवशी अभिजीत बिचुकलेंनी तिची ओळख घरातील सदस्यांची करून दिली. कालच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकलेमध्ये वादाची ठिणगी उडाली. विणाबरोबर टास्क दरम्यान झालेला आणि घरामध्ये सुरु असलेला वाद त्यांनी महेश मांजरेकरांना सांगितला. यावर विणानेदेखील तिचं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर पराग आणि अभिजीत बिचुकले यांमध्ये पराग सेफझोनमध्ये तर बिचुकले डेंजरमध्ये असे प्रेक्षकांना सांगितले. या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर हे आज कळणार आहे.

हेही वाचा- मुंबईकरांसाठी एवढं करूनही अमिताभ बच्चन झाले ट्रोल

5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर

First published: June 16, 2019, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading