मुंबई, 15 जुलै- काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली स्पर्धक शिवानी सुर्वेची पुन्हा घरामध्ये एण्ट्री झाली. नेहा, माधव, अभिजीत तिला पाहून आनंदी झाले. तर मागच्या आठवड्यात वीणा आणि रुपालीची किशोरी शहाणेंसोबतची वागणूक अत्यंत वाईट होती. संपूर्ण आठवडा ‘ताई तू बोलूच नकोस’ हेच वाक्य वीणाकडून ऐकायला येत होतं. किशोरी इतकं काहीच चुकीचं वागली नाही तरी रुपाली आणि वीणाने मिळून तिला टार्गेट का केलं... या गोष्टीवरून वीणा आणि रुपालीची महेश मांजरेकरांनी चांगलीच शाळा घेतली.
तसेच किशोरी तू एकटी खेळ, कोणी बरोबर असो वा नसो काहीच फरक पडत नाही या घरात सगळेच एकमेकांवर अवलंबून असल्याचं बाहेर दिसत आहे. तू एकटी खेळताना दिसशील तरी आणि तुला काहीच गरज नाही यांच्यापुढे लोटांगण घालण्याची, असं म्हणून महेश यांनी किशोरी ताईला पाठींबा दिला. गेल्या आठवड्यातील वाईट खेळाडू म्हणून शिव आणि वीणाचं नाव घेण्यात आलं. शिवने तर खेळणं सोडून दिलं असल्याचं मांजरेकर म्हणाले. यावेळी उत्तम खेळाडू म्हणून नेहा आणि अभिजीतचं नाव घेण्यात आलं. तर यावेळी त्यांनी नेहाला तू घाबरली आहेस का असा प्रश्नही विचारला. यानंतर हिनाने भाकरी मिळाली नाही या मुद्दयावरून सगळ्याचीच शाळा घेतली.
सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडनं शेअर केला हॉट फोटो, अर्जुन कपूरनं केली ‘ही’ कमेंट
आजच्या भागात शिवानी वीणाला जाब विचारताना दिसणार आहे. तर पराग आणि वीणा बोलत असताना पराग म्हणाला होता की, ‘आता मी हिला नादी लावतो’ त्यावर वीणा त्याला उत्तर देताना म्हणाली की, ‘हा ती आहेच तशी,’ नेमकी याच गोष्टीचा शिवानी जाब विचारताना आज दिसणार आहे. यावेळी वीणाने तिला असं काही बोलल्याचं आठवत नाही.
कतरिनाच्या बिकीनी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ, Viral फोटो तुम्हीही कराल Forword
आज घरात दोन खेळ खेळले जाणार आहेत. पहिल्यात स्पर्धकांना खंजीर, माचिस अशा काही गोष्टी दाखविण्यात येणार आहेत. या वस्तू पाहून त्याची उपमा कोणाला देतील ते पाहणं रंजत असणार आहे. तर दुसऱ्या खेळात प्रश्नोत्तर असणार आहेत. यात अक्टिव्हिटी एरियामध्ये एक सदस्य जाईल, त्याला एक प्रश्न विचारला जाईल त्याचं उत्तर आत बसलेला सदस्य तसेच बाहेर बसलेली शिवानीदेखील देईल. दोघांचं उत्तर जुळलं नाही तर आत बसलेल्या सदस्याच्या कानाखाली बसेल. आता कोणाची उत्तरं जुळतात आणि कोणत्या सदस्याच्या कानाखाली बसते हे आज कळेलच
सोनम कपूरनं शेअर केला तिच्या पंचहात्तरीचा लुक, म्हातारी झाल्यावर दिसेल अशी.
VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!