Bigg Boss Marathi 2 : शिवच्या बहिणीचे मोलाचे सल्ले तर, शिवानी-बिचकुलेंमध्ये वाद

Bigg Boss Marathi 2 : आज शिवानी अभिजीत बिचुकलेंवर थोडीशी चिडलेली दिसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 04:13 PM IST

Bigg Boss Marathi 2 : शिवच्या बहिणीचे मोलाचे सल्ले तर, शिवानी-बिचकुलेंमध्ये वाद

मुंबई, 1 जुलै : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज शिव ठाकरेला भेटायला त्याची बहीण मनीषा आणि आई आशा येणार आहेत. घरामध्ये आल्यावर शिवच्या आईने धम्माल आणली. आईला बघून शिव खूप खुश झाला, आईच येणार माहिती होते असेही तो म्हणाला. रूपालीला बोलताना शिवची आई म्हणाली हा बदमाश आहे. शिवशी बोलताना त्या म्हणाल्या किशोरी ताई म्हणतोस तर शिवानी, हीना आणि विणा सर्वच बहिणी आहेत तुझ्या. या वाक्यावर सर्वांना हसू फुटले. राखी देते बांधुन घे. आता नक्की त्यांना काय म्हणायचे होते हे जर शिवपर्यंत पोहचले तर ठीक !

शिवच्या आईसोबत शिवची बहीण मनीषा देखील घरामध्ये जाणार आहे. शिवच्या बहिणीने त्याची कानउघडणी केली. आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तो का आला आहे . तिचे म्हणणे होते, “अमरावती काय, विदर्भ काय संपूर्ण महाराष्ट्र तू ट्रॉफी घेऊन याव म्हणून प्रयत्न करत आहे. हा कार्यक्रम बघत आहे, ज्यांना बिग बॉस समजत देखील नाही तेदेखील फक्त तुझायसाठी बघत आहेत. तुझा फोकस हलतो आहे शिव. तुझ्या एकट्यासाठी भांड सगळेजण इथे समर्थ आहेत आणि म्हणूनच आलेना इथे खेळायला, तुझ्या भरावशावर आल आहे का कोणी ? तू दुसर्‍यांसाठी का भांडतो ? दुसर्‍यांची का बाजू घेतोस ? ती समर्थ आहे ना ? तू तुझ तुझ भांड तीच तिला भांडू दे यावर शिवच्या आईचे म्हणणे पडले, ती प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याला बोलू शकते ती हुशार आहे.

रस्त्यावरच्या महिलेचं हे गाणं ऐकून तुम्हाला येईल लतादीदींची आठवण

अजून एक महत्वाचा मुद्दा शिवच्या बहिणीने मांडला आणि तो म्हणजे, सगळ्या सदस्यांसोबत रहा एकटे नका राहू. इतके मोठे मोठे लोक आहेत किशोरी ताई आहेत, इतकी सुंदर अभिनेत्री नेहा आहे जिचा अभिनय तुला आवडायचा. यांच्यासोबत तुम्हाला एकत्र रहायला मिळत आहे. शिवच्या आईने आणि बहिणीने दिलेले मोलाचे सल्ले, मार्गदर्शन घेऊन आता शिव पुढे चालेल? त्याच्यामध्ये काही फरक पडेल? पुन्हा त्याचा गेममध्ये फोकस येईल? हे आजच्या भागात समजेल.

Love Breakups Zindagi ! आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा घटस्फोट

Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांचे पहिल्यापासूनच चांगले आहे. काल शिवानीचे वडील घरामध्ये येऊन गेले. त्यांनी देखील बिचुकलेंना सांगितले तुमचं आणि शिवानीचं टुयनिंग चांगलं आहे. तर अभिजीत केळकरचे देखील आभार मानले तो तिला बहिणी सारखे घरामध्ये वागतो. आज शिवानी अभिजीत बिचुकलेंवर थोडीशी चिडलेली दिसणार आहे. मुद्दा आहे कपडे सिलेक्ट करण्याचा. अभिजीत बिचुकलेंनी विणाला कपडे सिलेक्ट करायला संगीतले. आणि तिथून हा विषय सुरू झाला.

बॉलिवूडमधील 'ही' 10 लोकप्रिय गाणी, जी आहेत मूळ पाकिस्तानी गाण्यांची कॉपी!

शिवानीचे म्हणणे आहे, तुम्हाला कळत नाही का कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण तुमच्या मागे बोलते ? ती बाहेर येऊन काय बोली माहिती आहे का तुम्हाला ? उगाच तुम्ही कशाला चांगले बनायला जाता ? त्यावर बिचुकले म्हणाले मी सांगू का काय झाले ? त्यावर शिवानी म्हणाली मी काय बोलते ते पूर्ण होऊ द्या. तुम्ही विणाला सांगितले ना माझे कपडे सिलेक्ट कर.ती बाहेर येऊन म्हणाली, “मला इंटरेस्ट नाहीये कोणाचे कपडे सिलेक्ट करण्यात, आणि तेवढ्यात मी आले तर मला टोंबणा मारला ज्यांना असेल त्यांनी जाव. आता हा वाद किती वाढेल? यावर शिवानी तिला काही म्हणाली का ? अभिजीत बिचुकलेंचे यावर काय म्हणणे आहे? हे कळेल आजच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे.

==========================================================

दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...