Bigg Boss Marathi 2- अतिशहाणपणा नडला, विणा- शिवला मिळणार शिक्षा!

Bigg Boss Marathi 2- अतिशहाणपणा नडला, विणा- शिवला मिळणार शिक्षा!

बिग बॉसने कार्या संबंधीत काही नियम आखून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात काल सदस्यांना एक कार्य सोपवण्यात आले होते. यात त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेले आणि सर्वात वाईट कामगिरी केलेल्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे द्यायची होती. यातूनच कॅप्टनसीचा उमेदवार ठरणार होता. स्पर्धकांनी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अभिजीत केळकर या एकाच खेळाडूचं नाव दिलं. यानंतर आरोह वेलणकरचं नावंही घेण्यात आलं. आज अभिजीत आणि आरोहमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. आता या टास्कमध्ये शक्तिपेक्षा युक्ति वापरून कोणता ग्रुप उमेदवारी जिंकेल ते कळलेच. आरोहच्या टीममध्ये शिवानीअभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा असणार आहेत तर अभिजीतच्या टीममध्ये किशोरी, रुपाली, शिव आणि हीना असणार आहेत.

रांझणातील तळाला गेलेले पाणी वरती यावे यासाठी शक्तीऐवजी युक्ती वापरून कावळ्याने खडे टाकून पाणी प्यायले होते. कॅप्टन्सीची संधी आज तळाला गेलेल्या पाण्यासारखी आहे, जी सदस्यांना खडे टाकून  मिळवायची आहे. यासाठी  बिग बॉस स्पर्धकांना 'तहानलेला कावळा' हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहे. दरम्यान, बिग बॉसने कार्या संबंधीत काही नियम आखून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही. बिग बॉसचे नियम सगळ्या स्पर्धकांना पाळणं बंधनकारक आहे. पण शिव आणि विणाकडून महत्वाच्या नियमाचं उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे.

बिग बॉस सगळ्या स्पर्धकांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्यादरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. मात्र, कार्यादरम्यान शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खड्यां व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूलमध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीमच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत. आता टास्कमध्ये पुढे काय काय होईल... सदस्य अजून कोणत्या चुका करतील... कोणत्या नियमांचं उल्लंघन करतील... हे पाहणं रंदक असणार आहे.

Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

गोविंदानं नाकारली 'या' मोठ्या हॉलिवूड सिनेमाची ऑफर, कारण...

डोक्याला शॉट! 'प्लीज फोन करू नका, मी सनी लिओनी नाही'

SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या