Bigg Boss Marathi 2- माझे आई बाबा माझ्यासाठी ओझं नाही- रुपाली भोसले

Bigg Boss Marathi 2- माझे आई बाबा माझ्यासाठी ओझं नाही- रुपाली भोसले

लग्नानंतर मी माझं करिअर सोडून लंडनला गेले होते. मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडायला ७ वर्ष लागली.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले सदस्य त्यांच्यासोबत आतमध्ये अनेक किस्से, अनेक अनुभव, अनेक आठवणी घेऊन येतात... या १०० दिवसांमध्ये सदस्य आपला प्रवास, आपलं बाहेरचं जग, घरची मंडळी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी दुसऱ्या सदस्यांबरोबर शेअर करतात. रुपालीने देखील तिच्या आयुष्यातले किस्से,  तिच्या संसारात आलेला अनुभव सुरेखाताईना सांगितला. ज्या माणसाला माझे आई- बाबा ओझं वाटणार नाही त्या माणसासोबत आयुष्य काढायला मला आवडेल.

Bottle Cap Challenge- Akshay Kumarने एकाच किकमध्ये उघडलं बाटलीचं झाकण VideoViral

आई- वडील माझी जबाबदारी आहेत माझ्यासाठी ओझं नाहीये. मी माझ्या भावावर देखील यासाठी अवलंबून नाही, असं रुपालीने सुरेखाताईंना भावुक होऊन सांगितलं. लग्न करून पाहिलं. मी लंडनला होते. खूप वाईट अनुभव आले. तुम्ही माझ्यासोबत या घरामध्ये एक महिना आहात. तुम्ही बघितलं की मी स्वयंपाक उत्तम करते, काळजी घेऊ शकते मग मी माझं घर नाही का सांभाळू शकणार? आता पुन्हा सगळं नको वाटत.

मी माझ्या मैत्रिणींना देखील या सगळ्यातून जाताना बघितलं आहे. लग्नानंतर मी माझं करिअर सोडून लंडनला गेले होते. मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडायला ७ वर्ष लागली, त्यामुळे पुन्हा तो अनुभव नको अस वाटत. आता तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे परत त्या गोष्टीवर घालवायला.यानंतर सुरेखाताईंनी देखील रुपालीला आधार दिला.

Bigg Boss Marathi 2- वैशालीने सुरेखा ताईंवर केला चोरीचा आरोप, नेहाने लावली आग

SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

First published: July 3, 2019, 8:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading