Bigg Boss Marathi 2- ‘माझ्याशी नीट बोल, मी तुझी नोकर नाही’; हिना- रुपालीचा वाद चिघळला

रुपाली आणि हिनाच्या भांडणात नेहाने मध्यस्ती करत हिनाच्या तोंडी न लागण्याचा सल्ला दिला.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 02:57 PM IST

Bigg Boss Marathi 2- ‘माझ्याशी नीट बोल, मी तुझी नोकर नाही’; हिना- रुपालीचा वाद चिघळला

मुंबई, 19 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यात काल वैशाली आणि शिवचा सांकेतिक खून करण्यात शिवानी यशस्वी ठरली. आज शिवानी आणि नेहा मिळून कोणाचा खून करणार हे कळले. काल बिग बॉसने शिवला सामान्य नागरिक करत नेहाला खुनी केले. याबद्दल अभिजीत केळकरला माहिती दिली. आज घरात रुपाली, नेहाचं हीनासोबत मोठं भांडण होणार आहे. किचनमधील कामावरून त्यांच्यात वाद होणार आहे. हीनाने नेहाला तिला एक पोळी हवी असल्याचं सांगितलं.

त्यावर रुपालीने लंचची ड्युटी केली का असा प्रश्न हिनाला विचारला. यावर हिनाने तिने भांडी घासल्याचं सांगितलं. यानंतर रुपाली म्हणाली की, ‘मी तुला सांगितले होते की घासलेली भांडी लावायची.. ओटा स्वच्छ करायचा’ यावर हिनाने उत्तर देत म्हटलं की तिने सकाळच्या नाश्त्याची भांडी घासली. पण रुपालीचं त्याने समाधान झालं नाही. सकाळची भांडी किशोरी ताईने घासल्याचं रुपाली म्हणाली. रुपालीच्या या आरोपानंतर हिनाचा आवाज चढला. यानंतर रुपालीने हिनाला खडसावतं म्हटलं की, ‘माझ्याशी हळू आवाजात बोल. मी तुझी नोकर नाहीये.’ यानंतर दोघींचा वाद वाढतच गेला.

दोघींच्या भांडणात नेहाने मध्यस्ती करत हिनाच्या तोंडी न लागण्याचा सल्ला दिला. यानंतर हिना म्हणाली की, तिला जे जेवण हवं होतं ते मिळालं नाही. यावर नेहाने तिला जेवण काय हवं होतं असा प्रश्न विचारला. मग हिना आणि नेहाचा वाद सुरू झाला. आता हा वाद कुठपर्यंत जाईल हे आजच्या भागात कळेलच.

दरम्यान, घरातील स्टोअर रूममधून अभिजीत केळकर अचानकच गायब झाला होता. सदस्यांना तो नक्की कुठे गेला हे समजत नव्हते. काही सदस्यांना हा टास्कचा भाग असल्याचं वाटलं. दरम्यान, घरात मर्डर मिस्ट्रीचा टास्क सुरु झाला. आज अडगळीच्या खोलीमधून अचानक अभिजीतचा “मला बाहेर काढा” आवाज स्पर्धकांना ऐकू आल्यामुळे सगळेच घाबरले. शिव, विणा, वैशाली आणि इतर सदस्य धावत बाहेर आले. अभिजीत मला बाहेर काढा इतकच म्हणत होता, त्यामुळे शिव आणि विणाबरोबर इतर सदस्यांची घाबरगुंडी उडाली.

वैशाली आणि शिवने रुपालीकडे वारंवार चावी मागितली पण त्यावर रुपालीने काहीच उत्तर दिले नाही. त्याला बाहेर काढायचे आहे, हा टास्कचा भाग नाहीये असं शिव वारंवार सांगत होता. तरीही रुपालीने काहीच उत्तर दिलं नाही. अखेर शिवचा पारा चढला आणि कॅप्टनचा रुबाब दाखवू नकोस. आमच्यामुळेच तू कॅप्टन झालीस असं रुपालीला म्हणाला.

Loading...

यावर रुपाली शिवला म्हणाली की, ओरडू नकोस, मी ऐकलंय. शिव म्हणाला की तू कामच तसं करतेस. तुला कदरच नाहीये. लाज वाटत असेल तर पटकन दार उघड. यावर रुपाली शिवला ओरडून सांगते की तिला विचार करायला दोन मिनिटं द्या. रुपालीच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे... ती चावी देणार का... की बिग बॉसच्या घोषणेची वाट बघणार हे आज कळेलच.

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला निकने शेअर केला 'देसी गर्ल'चा फोटो

83 Video- रणवीरसोबत प्रॅक्टिस करताना लेकानेच मोडली संदीप पाटील यांची बॅट

Kulbhushan Jadhav यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त ट्वीट

'या' सहा अभिनेत्री ज्यांचे सेक्स सीन झाले होते लीक

SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...