Elec-widget

Bigg Boss Marathi 2- परागच्या त्या विनंतीवर रुपालीला आलं रडू Bigg Boss | Bigg Boss marathi 2 | Bigg Boss Marathi 2 | Parag Kanhere | Rupali Bhosle |

Bigg Boss Marathi 2- परागच्या त्या विनंतीवर रुपालीला आलं रडू Bigg Boss | Bigg Boss marathi 2 | Bigg Boss Marathi 2 | Parag Kanhere | Rupali Bhosle |

Bigg Boss | Bigg Boss marathi 2 | Bigg Boss Marathi 2 | Parag Kanhere | Rupali Bhosle | परागला रुपाली आवडते असे त्याचे म्हणणे असले तरीदेखील रुपालीने पराग तिचा चांगला मित्र असल्याचं ती म्हणाली.

  • Share this:

मुंबई, 27 जून- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या ‘टिकेल तोच टिकेल’ या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला उठवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या युक्ती करायच्या आहेत. बळाचा वापर न करता चातुर्याने त्या सदस्याला सिंहासनावरून उठवायचे आहे. रुपाली आणि पराग यांच्या मैत्रीची चर्चा सध्या घरामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगते आहे. परागला रुपाली आवडते असे त्याचे म्हणणे असले तरीदेखील रुपालीने पराग तिचा चांगला मित्र असल्याचं ती म्हणाली आहे. ‘टिकेल तोच टिकेल’ या टास्कच्या दरम्यान ज्या गोष्टी झाल्या त्यातील काही गोष्टी परागला पटल्या नाहीत आणि त्याने याबद्दल कॅप्टन शिवला सांगितले.

KGFस्टार यशने सांगितलं मुलीचं नाव, दोन दिवसांनी बायको म्हणाली मी पुन्हा प्रेग्नट

‘तुझ्या मदतीने मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे, मी सिंहासनावर बसलो नसताना देखील माझ्याविषयी काही गोष्टी बोलल्या जात होत्या. जोपर्यंत माझ्या घरच्यांबाबत आणि व्यवसायबाबत बोलत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण जिथे विषय दुसऱ्या व्यक्तीचा येतो, ज्या व्यक्तीला मी इथे भेटलो. जेव्हा आमच्या मैत्रीबद्दल बोलल जातं तेव्हा मला वाईट वाटलं. माझी एकच नम्र विनंती आहे की, तिसऱ्या व्यक्तीला यामध्ये आणू नका.’ ज्याला वीणाने देखील संमती दर्शवली. पराग आपलं मत व्यक्त करत असताना रुपालीला रडू कोसळले. आता ही गोष्ट विरोधी टीमला पराग कशा प्रकारे सांगेल... ते कितपत त्याचे ऐकतील... हे आज कळेलच.

जनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत!

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या सिझनचा विजेता कोण असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बिग बॉस घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क आणि सूचना देतातच पण ते सदस्यांना ससरप्राइजदेखील देतात. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नेहा शितोळेच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. नेहाचा वाढदिवस असल्याने शिव, हीना, अभिजित, वैशाली आणि सुरेखा ताई यांनी मिळून तिला सुंदरसं सरप्राइज दिलं.

Loading...

घरामध्ये केक आणू शकत नसल्याने त्यांनी कलिंगडलाच केक करत त्यावर वाढदिवसाचा मेसेज लिहून रात्री तिला सरप्राइज दिले. नेहाला बिग बॉसच्या घरामध्येदेखील छानसा बुके आणि केक पाठविण्यात आला. नेहा हे सरप्राइज पाहून भावूक झाली. तिच्यासाठी वैशालीने सुंदर गाणंही गायलं.

बाहुबलीच्या 'देवसेने'चा झाला अपघात, थोडक्यात बचावला पाय

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...