News18 Lokmat

Bigg Boss Marathi 2- घरातून दिगंबर नाईकची एग्झिट तर वीणा अभिजीत पुन्हा भिडले

टास्कवरून नेहाला प्रत्येक भाषेचा मान ठेवायला मांजरेकरांनी सांगितलं. शिवाय प्रत्येक टास्कमध्ये तिने त्रास दिल्याचं अभिजीतने सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 10:50 AM IST

Bigg Boss Marathi 2- घरातून दिगंबर नाईकची एग्झिट तर वीणा अभिजीत पुन्हा भिडले

मुंबई, 17 जून- घरात दरदिवशी बऱ्याच घटना घडत असतात. नुकतीच घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड म्हणून हिना पांचाळची एण्ट्री झाली. गेल्या आठवड्यात घरातून मैथिली जावकर घराबाहेर पडली. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणं अनिवार्य असणार आहे. या आठवड्यात पराग सुरक्षित झाला. तर नेहा शितोळे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईकमाधव देवचके नॉमिनेट झाले होते. यात अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले. मात्र या आठवड्यात दिंगबर नाईक यांना घरातून एक्झिट घ्यावी लागली. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल... कोण घराचा नवा कॅप्टन होईल... सदस्यांना कोणते टास्क मिळेल हे पाहणं रंजक असणार आहे.

हेही वाचा- अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये झालेल्या वादावरूनदेखील चर्चा झाली आणि प्रत्येकाने आपली मतं मांडली. या टास्कवरून नेहाला प्रत्येक भाषेचा मान ठेवायला मांजरेकरांनी सांगितलं. अभिजीत केळकरने देखील नेहा चुकीचा गेम खेळत होती आणि  प्रत्येक टास्कला तिने त्रास दिल्याचं सांगितलं. यावर नेहानेदेखील तिची बाजू मांडली. यानंतर सुरेखापरागवैशाली, दिगंबर यांचे तास छान झाले असं महेश मांजरेकर यांनी सांगितले. दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी कडक शब्दांत बिचुकले यांना खडसावले. त्यांच्या बोलण्यावर घरातील सदस्य इतके खुश झाले कीत्यांनी 'ही सुरेखा आम्हांला पटलेली आहे,' हे गाणंही म्हंटलं. शिवाय महेश मांजरेकरांनी त्यांनी जी शाळा घेतली ते योग्य असल्याचं म्हटलं.

हेही वाचा- ‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’

यावेळी घरात नवीन एण्ट्री घेतलेल्या हिनाला घरातील प्रत्येक सदस्याला एका विशेषणाचा क्राउन घालण्याची जबाबदारी सोपावली. हिनाने तापट बिचुकले, कन्फ्युज माधव, बोलबच्चन नेहा, फटकळ वीणा आणि डोकेबाज पराग अशाप्रकारे त्यांच्या घरातील वागणुकीनुसार विशेषणांचे क्राऊन घातले. बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल... प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल... कोण घराबाहेर जाईल... हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  

Loading...

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...