Bigg Boss Marathi 2- अन् माधवच्या चाहत्याने या स्पर्धकाविरुद्ध केली चुगली

‘एकच फाईट वातावरण टाईट’ या टास्कमधून महेश मांजरेकर सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची एक संधी सदस्यांना देणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 07:05 PM IST

Bigg Boss Marathi 2- अन् माधवच्या चाहत्याने या स्पर्धकाविरुद्ध केली चुगली

मुंबई, 07 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य रंगले होते. यात माधव देवचकेला घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान मिळाला. तर उत्तम खेळाडूचा मान शिवला मिळाला. आज रुपाली, वैशाली, हीना, सुरेखाताई आणि किशोरी शहाणे यांच्यात कोणाला घर सोडावं लागणार हे आजच्या भागामध्ये कळलेच. आज घरामध्ये सदस्य एकमेकांसाठी गाणी म्हणणार आहेत. हिनाने शिव आणि वीणासाठी आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हे गाणं म्हटलं, तर किशोरी शहाणे यांनी रुपालीसाठी आणि वैशालीने शिव आणि अभिजीतसाठी गाण गायलं.

‘एकच फाईट वातावरण टाईट’ या टास्कमधून महेश मांजरेकर सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची एक संधी सदस्यांना देणार आहेत. कोणता स्पर्धक कोणावर काग काढतो आणि कोणाच्या मनामध्ये काय सुरू आहे हे आज कळणार आहे. दरम्यान, माधवच्या चाहत्याने चुगली करत आता माधवला टार्गेट करू आणि मी कॅप्टन झाले कि, माधवला किचन साफ करायला लावू असं वीणा रुपालीला म्हटलं असल्याचं सांगितलं. यावर माधव आणि वीणाने काय सांगितले हे आजच्या भागामध्ये कळेलच.

महेश मांजरेकर यांनी WEEKEND चा डावमध्ये काल नेहाला खडेबोल सुनावले. नेहाने 'कॅप्टनशीप' आणि 'अतिथी देवो भव:' या टास्कमध्ये ज्याकाही चुका केल्या, ज्याप्रकारची तिची वागणूक घरात होती, याबद्दल तिला  खडसावले. नेहाने परागची जागा घरात घेतली असून ती आता हुकूमशहासारखी वागते असे त्यांनी सांगितले. याशिवाय अभिजीत, माधव, वैशाली, वीणा सगळ्यांनीच नेहा कुठे चुकली हे महेश मांजरेकरांना सांगितले... त्यावर महेश मांजरेकरांनी वेळीच सावध हो असे देखील तिला बजावले.

याशिवाय वीणाचीही मांजरेकरांनी शाळा घेतली. मी माधवला दोनच मिनिटं सहन करू शकते, असं नेहाचं बोलणं अत्यंत चुकीचे आहे, तुला असं कोण म्हणाला तर आवडेल का ? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी वीणाला विचारला. यानंतर वीणाने माधवची माफी मागितली.

या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

Loading...

VIDEO- या मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेली डान्स पाहून हृतिक झाला अवाक्

VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है...’

सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2019 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...