मुंबई, 12 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांना ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य दिले. यात टीम एमध्ये रुपाली, नेहा, हिना आणि माधव आहेत तर टीम बीमध्ये वैशाली, शिव, वीणा, अभिजीत केळकर आहेत. यावेळी किशोरी शहाणे या संचालिका म्हणून काम करणार आहेत. भूत असलेल्या टीमने काळे कपडे घालायचे आहेत आणि शिकारी असलेल्या टीमने पांढरे कपडे. काल वीणा, अभिजीत आणि शिव सेफमध्ये गेले तर वैशाली सेफमध्ये जाऊ न शकल्याने ती कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली.
अभिजीत, वीणा आणि शिवला हिनाला कॅप्टन करायचे नाहीये. त्यमुळे आजच्या भागात काय होणार हे पाहणं औत्सुकतेचे असणार आहे. शिवाय टीम बीमधील कोणता सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणार हे आज कळेल. याशिवाय नवा कॅप्टन कोण होणार... काय काय खलबतं रचली जाणार... टीम एच्या बाहुल्या कुठे लपवल्या जाणार हे सगळं आज कळेल.
आजच्या भागात अभिजीत, वैशाली आणि शिव हे टीम एच्या बाहुल्या कुठे लपवता येऊ शकतील याबद्दल गहन चर्चा करताना दिसणार आहेत. यावेळी अभिजीत म्हणतो की त्याने याचा कालच विचार करून ठेवला आहे. बाहुल्या कॅमेराच्या वरती, तुळशीच्या खाली खड्डा आहे तिथे लपवू शकतो, असं अभिजीत शिव आणि वैशालीला म्हणाला. आता बघूया यांनी लपवलेल्या बाहुल्या टीम ए शोधू शकतील का?
दरम्यान माधवकडे अभिजीतने त्यांची पांढरी पॅन्ट मागितली. पण माधवने त्याच्याकडे दोन पॅन्ट असूनही दिल्या नाहीत. त्या मागच कारण सांगताना माधव म्हणाला की, त्याने एक पॅन्ट घातली होती आणि ती खराब झाली. यावर अभिजीत त्याला म्हणाला की मी पॅन्ट खराब नाही करणार. त्यावर माधव म्हणाला की, त्याने खराब होणार नाही असं सांगितलं पण झालीच तर धुवून देईन असं म्हणाला नाही. म्हणून मी त्याला दिलं. यानंतर अभिजीतने मला मिळाली माझं काम झालं असं म्हणत तिथून निघून गेला.
यावर माधव म्हणाला की, एखाद्या गोष्टीची गरज आहे तर ती कशी मागितली पाहिजे, हे त्याला कळत नाही. भाकरी करण्यासाठी तेल मागण्याची पद्धत नीट पाहिजे. तसंच एखाद्याला विनंती करताना ते कसं बोललं पाहिजे हे त्याला कळायला हवं. यावर किशोरीताईचे देखील म्हणणे पडले. प्लीज तर आपण म्हणूच शकतो.
या 10 सेलिब्रिटींनी शेअर केले हॉट फोटो, एक तर बॉलिवूडची स्टार
पराभवानंतर कोहलीवर भडकला अभिनेता, म्हणाला- 'सोडून दे कॅप्टन्सी'
अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं
SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला