Bigg Boss Marathi 2 : वीणा तू मला सतत शांत बसायला सांगू नकोस- किशोरी शहाणे

Bigg Boss Marathi 2 : वीणा तू मला सतत शांत बसायला सांगू नकोस-  किशोरी शहाणे

KVR ग्रुपमध्ये असेलल्या गैरसमजांमुळे आता या घरातील पहिला ग्रुप तुटला असून आता तिघी वैयक्तिक खेळत आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै- बिग बॉसच्या घरात काल केव्हीआर ग्रुपचे खटके उडाले. या ग्रुपमध्ये एवढी चर्चा कसली सुरू होती याची उत्सुकता घरातील इतर सदस्यांना होती. वैशाली, शिव आणि माधव तर तिघी काय बोलत असतली याच्याबद्दलच चर्चा करत होते. किशोरी ताईने झालेल्या प्रकाराची खंत कॅमेराकडे व्यक्त केली. यावेळी माधवने किशोरी शहाणे यांना सगले गैरसमज दूर झाले का असा प्रश्नही केला. माधवने केलेल्या विचारपूसबद्दल नंतर किशोरी ताईने रुपालीला येऊन सांगितले. यावर रुपाली म्हणाली की, आपल्या ग्रुप मध्ये काय होतं आणि भांडणं का होतात याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते.

यावर चर्चा केल्यानंतर आपल्यात असं काहीच नाही असं दोघींचंही म्हणणं पडलं. तसेच आपण कधीच दुसऱ्या ग्रुपमध्ये डोकावत नाही. यानंतर रुपालीने किशोरी यांची माफी मागितली. दरम्यान, माधवने विचारलेल्या प्रश्नावर वीणा रुपालीला म्हणाली की, मी ग्रुपमध्ये नाही. मी वैयक्तिक खेळत आहे. जे या ग्रुपमध्ये आहे त्यांनी बोलावं.

दरम्यान, आज घरात “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या कार्याचा परिणाम पुढील आठवड्याच्या कॅप्टनसीवर होणार आहे. कार्यात वेळोवेळी वाजणाऱ्या बझरनंतर भूत झालेला सदस्य जर सेफ होऊ शकला नाही तर तो सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. आता कोण स्पर्धेत राहणार आणि कोण बाद होणार हे बघणे रंजक असणार आहे.

KVR ग्रुपमध्ये असेलल्या गैरसमजांमुळे आता या घरातील पहिला ग्रुप तुटला असून आता तिघी वैयक्तिक खेळत आहेत. कोणत्याही ग्रुपच्या त्या सदस्य नाहीत असे त्यांनी एकमेकींकडे आणि घरातील इतर सदस्यांकडे स्पष्ट केले आहे. WEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकरांनी वीणाला याआधीच स्पष्ट केलं की, स्पष्टवक्तेपणा आणि रूड यामध्ये फरक असतो आणि तू रूड होतेस. यानंतर तिने माधवची माफीदेखील मागितली होती. पण वीणाचा उद्धटपणा घरामध्ये वाढत चालला असून तिचा अॅटिट्युडही अनेकदा चुकतो असं रुपाली आणि किशी यांचं म्हणणं पडलं. यामुळे आज घरामध्ये पुन्हा वीणा आणि किशोरीताईमध्ये वाद होणार आहे.

वादात वीणा सतत किशोरी यांना तू थांब असं म्हणवून थांबवत होती. किशोरी यांना वीणाची हीच गोष्ट खटकली आणि त्यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. किशोरी वीणाला म्हणाल्या की, 'स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा वेगळा असतो. मी शांत बसते याचा अर्थ असा नाही तू मला काहीपण बोलशील. तू अजिबात माझ्याशी बोलू नकोस.' त्यावर वीणा म्हणाली, 'मला पण नाहीच बोलायचे आहे तुझ्याशी.' आता बघूया हे गैरसमज, ही भांडण कधी संपणार आणि या तिघी परत एकत्र येणार की नाही ते लवकरच कळेल.

बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

Bigg Boss Marathi 2- KVR ग्रुप फुटणार? किशोरी, वीणा मधला वाद असा आला चव्हाट्यावर

'या' गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची

First published: July 11, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading