Bigg Boss Marathi 2- अन् बिग बॉसला घरातील स्पर्धकांची लाज वाटली

Bigg Boss Marathi 2- अन् बिग बॉसला घरातील स्पर्धकांची लाज वाटली

बिग बॉस मराठीच्या घरात चर्चेत असलेला केव्हीआर ग्रुपमध्ये कुठेतरी फुट पडत असल्याचं काही दिवसांपासून दिसतंय.

  • Share this:

मुंबई, 08 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. आता या आठवड्यामध्ये बिग बॉस सदस्यांना कुठला टास्क देणार... कोण नॉमिनेट होणार... प्रेक्षकांची मतं कोणाला वाचवणार... हे पाहणं रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता नऊ सदस्य राहिले आहेत. परंतु आज बिग बॉस या नऊ सदस्यांची त्यांना कशी लाज वाटते ते जाहीर करणार आहेत. तसेच शिक्षा म्हणून बिग बॉस सगळे लक्झरी पदार्थ जप्त करत आहेत. यानंतर स्पर्धक बिग बॉसची माफी मागतात. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. तसेच कॅप्टन माधवला कोणती शिक्षा मिळेल आणि स्पर्धकांनी नेमकं केलं तरी काय हे आजच्या भागात कळणार आहे.

हिना आणि शिवमध्ये दर आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं होतच असते. आजदेखील हिना ‘रुपालीने मला प्रश्न विचारला आणि मी माईक न घालताच उत्तर दिलं,’ असं म्हणाली. त्यावर वैशालीने बिग बॉस म्हणूनच ओरडले असे म्हणाली. यानंतर वैशाली म्हणाली की, ‘जे लोक कधीच चुका करत नाहीत, ती माईक विसरायला लागली आहेत.’ यावर शिव मोठ्याने बोलतो की कोणीतरी माईक विसरलं. त्यावर हिनाने शिव मध्ये न बोलण्याबद्दल सांगितले. उत्तर म्हणून शिवही मी तुझ्याशी बोलत नसून वैशाली ताईशी बोलत आहे आणि तू प्रत्येकवेळी भांडणाच्या मूडमध्ये राहत नको जाऊस. तू कोण मला सांगणारी बोलू नकोस.’ असं शिव म्हणाला. यावर पलटवार करताना हिना म्हणाली की, ‘कारण माझ्याबद्दल हा विषय सुरू आहे आणि तू माझ्याबद्दल बोललेलं मला आवडत नाही.’

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात चर्चेत असलेला केव्हीआर ग्रुपमध्ये कुठेतरी फुट पडत असल्याचं काही दिवसांपासून दिसतंय. कालच्या विकेंडच्या डावमध्ये देखील किशोरी शहाणे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मला एकट पाडलं जात आहे असे त्यांनी सांगितले. रुपाली आणि वीणाने त्यांना किशोरीताई बद्दल न पटणाऱ्या गोष्टी ‘एकच फाईट वातावरण टाईट’ या टास्कमध्ये सांगितल्या. नेमकी हीच गोष्ट त्यांना खटकली आणि त्यांना वाईट वाटलं. किशोरीताईंनी वीणा आणि शिव यांच्या मैत्रीबद्दल केलेले वक्तव्य या दोघींना अजिबात पटले नव्हते. किशोरी शहाणे यांनी वीणाला विचारले तुमचा दोघांचा टाईम पास कुठवर आला आहे. यावर वीणा खूप दुखावली गेली होती. रुपालीने देखील तिला न पटणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या खूप दिवसांपासून मनामध्ये साचल्या होत्या. आता किशोरी शहाणे यांना घरामध्ये एकटे वाटू लागल्याचं त्यांनी घरातील कॅमेरासमोर सांगितलं.

किशोरी म्हणाल्या की, ‘ज्याप्रकारे हे माझ्याशी वागत आहेत, इतका मोठा काहीच प्रोब्लेम झालेला नाही. मला समजून नाही घेत, माझ्याकडे दुर्लक्ष करतात, मला एकट पाडायचे असेल तर ठीक आहे मी तरी का मेहेनत घेऊ. जे माझ्याशी बोलत आहेत त्यांच्याशी बोलल तरी सगळ्यांना त्रास होतो. मला वाटलं होत की, रुपाली आणि वीणा तरी मला समजून घेतील, पण आता त्याच मला समजून घेत नाही. आता इतर लोक समजून घेतील असं वातावरण झालं आहे. ज्या सदस्याला मला पाठींबा द्यायचा आहे तो माझ्याशी बोलतच नसेल, तर नुसत टास्कसाठी एकत्र आहोत असं होतं.’

‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत

जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो

मलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती

VIDEO : भाजपात दाखल झाल्यानंतर सपना चौधरी म्हणते...

First published: July 8, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading