Bigg Boss Marathi 2- या रविवारी शिवानी सुर्वे करणार कमबॅक?

Bigg Boss Marathi 2- या रविवारी शिवानी सुर्वे करणार कमबॅक?

शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या यामुळे घरातले सगळे सदस्य वैतागले होते. महेश मांजरेकरांनी तिला वारंवार समजावूनही तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले नव्हते.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेली शिवानी सुर्वे लवकरच घरात कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवानी आणि वीणा जगताप यांच्यातला वाद सर्वोश्रूत आहे. दोघींमध्ये विस्तव जात नाही. शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या यामुळे घरातले सगळे सदस्य वैतागले होते. महेश मांजरेकरांनी तिला वारंवार समजावूनही तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले नव्हते. तसेच आपणच कसे योग्य आहोत हेच दाखवून देण्याचा ती सतत प्रयत्न करत होती.

टास्क न खेळणं, बिग बॉसने दिलेली शिक्षा भोगण्यास नकार देणं, तसेच इतर स्पर्धकांशी फार उद्धटपणे वागल्यामुळे तिला बिग बॉसने घरातून बाहेर काढले होते. शिवानीने तिला घरातून बाहेर जायचे आहे असं बिग बॉसला सातत्याने सांगितलं होतं. तसेच जर त्यांनी तिला घरी सोडले नाही तर ती बिग बॉसवर कायदेशीर कारवाई करेल अशी धमकीही देत होती. अखेर तिला घरातून बाहरे काढण्यात आलं. पण आता ती पुन्हा घरात एण्ट्री घेतेय अशी चर्चा आहे.

या आधी दिलेल्या मुलाखतीत शिवानीने म्हटलं होतं की, घरातून बाहेर पडल्यावर तिला आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला होता आणि आपण रागावर संयम ठेवायला हवा होता असंही तिने मान्य केलं. शिवाय तिला बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा जायला खूप आवडेल. तिच्या याच वक्तव्यामुळे शिवानीच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

Dare you mess with her • @colorsmarathiofficial आज #BiggBossMarathi2 च्या घरात घुमणार का वादाचा पहिला आवाज? पाहा आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @voot वर कधीही.

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve) on

आता या रविवारी शिवानीची एण्ट्री होणार की नाही हे तर लवकर कळेलच. दरम्यान, बिग बॉसच्या घरात शिवानीची एण्ट्री झाली तर नवीन मसाला प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात काही शंका नाही. शिवाय रुपाली, वीणा आणि किशोरी यांचा  KVR ग्रुप तुटल्याचा शिवानीला किती फायदा होतो.. वीणा आणि शिवानीमध्ये पुन्हा भांडणं होणार का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या रविवारी मिळतील.

Bigg Boss Marathi 2 : त्या पांढऱ्या पँटवरून होणार का बिग फाईट?

राधिका आपटे आणि देव पटेलचा लव्ह सीन झाला लीक

Sacred Games Season 2 : शाळेत दोनदा नापास झालेला 'बंटी', एका रात्रीत बदललं नशीब

VIDEO दोन्ही हात नाहीत, तरी Indian Idon गाजवलं, आता सलमानबरोबर गायलं 'हे' गाणं

आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या