Bigg Boss Marathi 2- हिना- शिवचा वाद सोडवताना घरातल्यांची झाली धावपळ Bigg Boss | Bigg Boss Marathi | Bigg Boss Marathi 2 | Hina Panchal |

Bigg Boss Marathi 2- हिना- शिवचा वाद सोडवताना घरातल्यांची झाली धावपळ Bigg Boss | Bigg Boss Marathi | Bigg Boss Marathi 2 | Hina Panchal |

बिग बॉसच्या घरामध्ये आज सगळ्या सदस्यांची घाबरगुंडी उडाली कारण अचानक घरामध्ये सायरन वाजला आणि घरातील लाइट्स जाणार असे वाटत असताना बिग बॉस यांनी घोषणा केली.

  • Share this:

मुंबई, २ जुलै- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीचा टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. यात माधवने बाजी मारली आणि तो घराचा नवा कॅप्टन झाला. तसेच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्यदेखील पार पडले. यात किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हिना पांचाळ, वैशाली म्हाडे आणि रुपाली भोसले नॉमिनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार... कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार... हे पाहणं रंजक असणार आहे.

दरम्यान हीना आणि शिवमध्ये घरात नेहमीच बरेच वाद होत असतात. मग ते वीणा वरून असो वा टास्क दरम्यान असो. आजदेखील हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या. ते एकमेकांसोबत मजा मस्ती करत होते. तिथे हीना अभिजीतच्या हाताला क्रेप बँडेज लावत होती. दरम्यान वैशाली शिवला अभिजीत नात्यांमध्ये गल्लत करत नाही असं म्हणाली. त्यावर अभिजीतही हो म्हणाला.

…म्हणून युवराज सिंगच्या पार्टीत अंगद बेदी- नेहा धुपिया दिसले नाहीत

यानंतर शिवने यावरून अभिजीतला चिडवायला सुरुवात केली. पण कुठेतरी हीनला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगत पुन्हा असं बोलास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देईन अशी धमकीच दिली. यावर शिवदेखील तुझ्याशी बोललो नाही मग माझ्याशी असं बोलायचं नाही अशी चेतावणी दिली. एवढं बोलून शिव थांबला नाही तो पुढे म्हणाला की, ‘तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार.’ शिव असं काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली आणि आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे आजच्या भागामध्ये कळेलच.

दिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या