Bigg Boss Marathi : विणा-आरोहमध्ये वादाची ठिणगी तर, बिचुकलेंना पाण्यात उभं राहण्याची शिक्षा

Bigg Boss Marathi : विणा-आरोहमध्ये वादाची ठिणगी तर, बिचुकलेंना पाण्यात उभं राहण्याची शिक्षा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांवरून भांडण होतच असतात. आज वीणा आणि आरोहमध्ये वादावादी होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीसाठी उमेदवार निवडण्याचे बिग बॉस यांनी सदस्यांवर कार्य सोपावले होते. या कार्यात सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद झाले, मतभेद, भांडण झाली आणि अखेर या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी दोन उमेदवार मिळाले. या आठवड्यामध्ये ‘म्हातारीचा बूट’ हे कॅप्टनसी कार्य शिव आणि किशोरी शहाणे मध्ये रंगणार आहे. आता हा टास्क सदस्य कसा पार पाडतील आणि घराचा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. टास्क दरम्यान शिव आणि आरोहचा वाद होणार आहे. आरोह म्हणाला, ‘काही ताकद नाहीये त्याच्यामध्ये फुसका आहे तो’. वीणाचे म्हणणे पडले ‘दादागिरी नाही करायची.’ आरोहचे म्हणणे आहे ‘प्रत्येक टास्कमध्ये हेच होतं, मी नाही खेळणार टास्क.’ त्यामुळे या टास्कचं पुढे काय होईल हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

आज 56 वर्षांची असती 'चांदनी'! श्रीदेवीची आठवण करून देतील, जान्हवी कपूर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांवरून भांडण होतच असतात. कोणीच कोणाचे ऐकायला तयार नसते. शब्दाला शब्द वाढत जातो आणि त्याबरोबर वाद देखील विकोपाला पोहचतो. आज वीणा आणि आरोहमध्ये वादावादी होणार आहे. वीणाने हीनाला असे म्हटले की, आरोहला सगळ्यांपासून प्रॉब्लेम आहे आणि याचाच जाब आरोह वीणाला विचारणार आहे. त्यावर वीणाने असे हीनाला सांगितल्याचे कबूल देखील केले आणि ती असे का म्हणाली याचे स्पष्टीकरण देखील दिले की तुला सगळ्याच बाबतीत प्रॉब्लेम असतो, तुला अनावश्यक गोष्टीचा त्रास होतो. त्यावर आरोहचे म्हणणे आहे तू कोण ठरवणारी कोणती गोष्ट आवश्यक आहे आहे कोणती नाही. त्यावर वीणा म्हणाली तू कोण ठरवणारा मी काय करणार आणि काय नाही ? आणि वाद वाढतच गेला. वीणाने सांगितले या घरामध्ये तू नाही ठरवणार मी काय करायचे आणि मी नाही ठरवणार तू काय करायचे. वीणाचे अश्याप्रकारे बोलणे आरोहला आवडले नाही तो तिला म्हणाला हा अॅटीट्यूड घरी ठेव.

‘तारक मेहता...’मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एंट्री, जेठालालनं केला खुलासा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे आणि तसे जर कोणत्या सदस्याने केले तर तो सदस्य शिक्षेस पात्र असतो. अभिजीत बिचुकले बर्‍याचदा या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. आज अभिजीत बिचुकले पुन्हाएकदा नियम मोडताना दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे आणि तसे केल्यास कोंबडा आरवतो हे माहिती असताना देखील बिचुकलेंनी तो नियम पुन्हा मोडला. शिवानीचे म्हणणे पडले आता त्यांना आतमध्ये म्हणजेच अडगळीच्या खोलीमध्ये टाक. तर नेहा म्हणाली मी त्यांना कालच सांगितले आहे आता मी पाण्यात उभे करणार आहे.

शारीरिक शोषण, अश्लील कमेंट, बोल्ड फोटो... आईच्या तक्रारीनंतर पलकनं सांगितलं सत्य

नेहा आज अभिजीत बिचुकले यांना स्वीमिंग पूलमध्ये उभे रहाण्याची शिक्षा देणार आहे. अभिजीत बिचुकलेंचे त्यातही म्हणणे आहे पूर्ण उभा नाही राहू शकत तर नेहा देखील पाण्यात उतरली. नेहाचे म्हणणे पडले तुमची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे पूर्ण पाण्यात उभे रहा, नेहाने सदस्यांना त्यांच्याशी बोलण्यास मनाई केली. शिक्षेमध्ये देखील बिचुकले काही ना काही मजेचा मुद्दा शोधतात आणि घरातल्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

========================================================================

SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 05:24 PM IST

ताज्या बातम्या