Bigg Boss Marathi 2: कोण होणार बिग बॉस मराठी २ चा पहिला कॅप्टन?

शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले. पण, आता शिवानीने बिचुकले यांना मदत केली.

  • Share this:

बिग बॉसच्या घरात कालचा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला... विणा आणि नेहाच्या डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉसने सांगितले.

पराग आणि वैशालीमधील वाद, तसेच रुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकलेमधील वाद खूप टोकापर्यंत गेले. या सगळ्यात रुपाली भावुकदेखील झाली.

एकीकडे विणा आणि शिवानीमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात KVR ग्रुप तयार झाला. एवढं सगळं झालं तरी आजचा दिवस जरा हलका फुलका असणार आहे. सगळ्या सदस्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात नागिन डान्सने होणार आहे.

KVR ग्रुपचं बॉण्डिंग त्यांची इच्छा काय आहे हे पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात जोपर्यंत लाइट बंद होत नाही तोपर्यंत सदस्यांना झोपण्यास सक्त मनाई असते. पण आज बरेच सदस्य या नियमाचं उल्लंघन करताना दिसणार आहेत.

सगळ्यात उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे आज कळणार आहे. अभिजित बिचुकले यांच्या टीममधून नेहा आणि वैशाली म्हाडेच्या टीममधून शिव यांना कॅप्टनसीची उमेदवारी देण्यात आली आहे. आता घरातील सदस्य कोणाला पहिला कॅप्टन करणार हे आज कळेल.

बिग बॉसच्या घरात एकीकडे मैत्री आणि ग्रुप्स तयार होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यामध्ये कटुता आली आहे त्यांनी ती कटुता विसरून पुन्हा चांगले संबंध कसे होतील या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.

शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले. पण, आता शिवानीने बिचुकले यांना मदत केली. दोघांमधील वाद विसरून तिने त्यांची मदत केली. शिवानीने त्यांची बॅग, त्यांचे कपडे आवरून ठेवायला सांगितले आणि त्यांची जागा स्वच्छ करून घेत असताना अभिजित बिचुकले यांनी शिवानीला मॉनिटर असे नावं ठेवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या