Bigg Boss Marathi 2- 'पराग तू मला धमकी देऊ नकोस', शिव- परागमधला वाद चिघळला

नेहा आणि शिवमध्ये झालेल्या धक्काबुक्कीतून नेहा खाली पडली. नेहाने वेळोवेळी शिवला थांबायला सांगितले पण शिव नेहाचं काहीच ऐकत नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 05:38 PM IST

Bigg Boss Marathi 2- 'पराग तू मला धमकी देऊ नकोस', शिव- परागमधला वाद चिघळला

मुंबई, 17 जून- बिग बॉस मराठीच्या घरामधून काल दिगंबर नाईक घराबाहेर पडले. आज बिग बॉसच्या घरामध्ये काय होईल आणि कोणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल हे पाहणे रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हिना पांचाळ हा नवीन सदस्य आला. आज होणाऱ्या टास्कमध्ये ती कोणती भूमिका घेईल, घरात होणाऱ्या वाद- विवादांना कसं उत्तर देईल हे तर कळेलच.

शिव आणि परागमध्ये वाद : नेहा आणि शिवमध्ये झालेल्या धक्काबुक्कीतून नेहा खाली पडली. नेहाने वेळोवेळी शिवला थांबायला सांगितले पण शिव नेहाचं काहीच ऐकत नाही. टास्क दरम्यान अशा गोष्टी होताना बऱ्याचदा पाहायला मिळतात, पण या टास्क दरम्यान घरामध्ये शिव आणि परागमध्ये झालेला वाद विकोपाला जाताना दिसेल. शिवची ही गोष्ट परागला पटली नाही आणि त्यामुळे ती त्याने शिवला सांगण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच दोघांमध्ये वाद रंगला. नेहा पडली आणि ती त्याचं आता भांडवल करणार. नेमकी हीच गोष्ट शिववर शेकेल आणि हे शिवला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण  शिवने परागला शांत बसायला सांगितले आणि शिवचे हेच वागणे परागला पटले नाही.

भाच्याच्या बर्थडेमध्ये सलमान खानने केला स्टंट, हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच

परागने ‘मी तुला चांगला सल्ला देतो आहे,’ असं शिवला सांगितले. पण ‘मला शिकवू नकोस,’ असं शिव म्हणाला. ‘मी नेहाची माफी मागितले आहे आणि शनिवार रविवारच्या भागात काय होईल त्याला मी सामोरे जाईन, मी बघेन काय करायचं.’ शिवला समजावताना पराग म्हणाला की, ‘पुढच्या वेळेस असं वागताना विचार कर.’ पण परागचं ऐकेल तो शिव कसला. परागला उत्तर देताना शिव म्हणाला की, ‘मी कृती केल्यावर विचार करत नाही आणि मला धमकी देऊ नकोस.’ आता वाद कुठवर गेला हे आजच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल.

VIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा

Loading...

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...