Bigg Boss Marathi 2- बिचुकलेचा केला गेम, सर्वांनी मिळून स्विमिंग पूलमध्ये फेकलं

Bigg Boss Marathi 2- बिचुकलेचा केला गेम, सर्वांनी मिळून स्विमिंग पूलमध्ये फेकलं

Bigg Boss Marathi 2- स्पर्धक पुर्णपणे साम दाम दंड भेद याचा चातुर्याने उपयोग करून टास्क जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 जून- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. ज्यामध्ये सदस्य पुर्णपणे साम दाम दंड भेद याचा चातुर्याने उपयोग करून टास्क जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. काल या टास्कमध्ये विणाची टीम विजेती ठरली. आजदेखील विणा आणि पराग मॅनेजर असून आज हे दोघे कुठल्या योजना आखून टास्क जिंकतील हे पाहणे रंजक असणार आहे. काल नेहा, पराग विरुद्ध शिव अशी खडाजंगी पाहायला मिळाली. टास्कदरम्यान परागची तब्येत थोडी बिघडली. यामध्येच शिवने विरोधी टीमची ईस्त्री चोरली.

आजदेखील टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम बळाचा वापर करताना दिसणार आहेत. यावर उपाय म्हणून संचालीका म्हणजेच वैशाली “मी दोन्ही टीमला डिसक्वालिफाय करत आहे असे जाहीर केले.”, आता हे साप्ताहिक कार्य कसे पुढे जाणार? हे बघणे रंजक असणार आहे. एकीकडे घरात टास्कवरून वाद होताना दिसतात तर दुसरीकडे सदस्यांमध्ये बरीच मस्तीदेखील होत असते. आज सगळे सदस्य मिळून अभिजीत बिचुकले यांना पाण्यामध्ये टाकणार आहेत.

Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक

'अभिजीत बिचुकले मनोरुग्ण, त्याला चपलेने हाणला पाहिजे'

International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी

First published: June 21, 2019, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading