मुंबई, 17 जुलै- सध्या घरात रोज नवनवीन आव्हानं आणि टास्क दिले जात आहेत. आजदेखील घरात एक वेगळा टास्क होणार आहे. अभिजीत स्टोअर रूममध्ये जातो आणि तिथून परत बाहेर येतच नाही. अचानक तो गायब होतो. अभिजीत अचानक कुठे गेला आणि त्याला कोण घेऊन गेलं हे आजच्या भागात कळणार आहे. या घटनेनंतर बिग बॉस घरात घोषणा करत स्पर्धकांना सावधतेचा इशारा देतात. तसेच बिग बॉसच्या घरावर एक संकट आलेलं असून, घरातील सदस्यांविरुध्द एक मोठा कट रचण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या कटाची सुरुवात अभिजीत केळकर यांच्या गायब होण्यापासून झाली आहे. त्यामुळे घरातील सर्व स्पर्धकांना सतर्क राहणं गरजेचं असल्याचं बिग बॉस यांनी सांगितलं.’ आता अभिजीत केळकर कुठे गेला... कधी परतणार... मर्डर मिस्ट्री या टास्कचाच हा भाग आहे की अजून काही हे आजच्या भागात कळले.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात काल शिवानी आणि वीणामध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली. वीणा शिवानीबद्दल जे काही बोलली त्यावर माफी मागण्यासाठी तिने दोन दिवस घेतले. पण आता मला तिची माफी नको मी पण तिच्याबद्दल बोलणार. मी आत येताना तिच्याबद्दल माहिती काढून आले आहे असं शिवानी म्हणाली. शिवानी पुढे म्हणाली की, ‘मी तिला नाही म्हंटलं की माझे पाय पकडून माफी माग. पण तिच्या अशा बोलण्याने माझ्यापेक्षा माझे आई बाबा जास्त दुखावले गेले. खूप चुकीचा मेसेज जातो बाहेर,’ असं ती म्हणाली.
हे होत असताना मी तुला माझ्या बोलण्याचा काय अर्थ होता हे सांगितलं तरीसुध्दा विषय का वाढवते असा प्रश्न वीणाने शिवानीला विचारला. तसेच ‘मी टास्क नंतर माफी मागणार होते’ असं वीणा म्हणाली असता, शिवानीने वीणाला खडसावून सांगितले की, ‘मला माफी नको आणि तू आता बघ आणि ऐक मी काय बोलू शकते. आता मला कोणीच थांबवू शकत नाही. यावर शिवने मध्यस्ती करत जर वीणा माफी मागत आहे तर विषय न वाढवण्याचा शिवानीला सल्ला दिला.
त्यावर शिवानी शिवला म्हणाली की, तू या सगळ्यात पडू नकोस. जर तुला दुसरं काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोल पण याविषयावर बोलू नकोस. यानंतर वाद वाढतच गेला. शिवानी वीणाला म्हणाली आता तर विषय सुरु झाला आहे संपला नाहीये.
हा वाद सुरु होत असताना बिग बॉस यांनी शिवानी आणि वीणाला कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतले. बिग बॉस यांनी दोघींना सूचना दिली की, या घरात बाहेरील वैयक्तिक गोष्टींवर शेरेबाजी करण्यास सक्त मनाई आहे आणि अशी चूक पुढे दोघींकडून घडणार अशी ताकीद दिली. यानंतर शिवानीच्या सांगण्यावरून वीणाने शिवानीच्या आई वडिलांची आणि अजिंक्यची माफी मागितली.
आलिया भट्टच्या पर्सच्या किंमतीत वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
'नच बलिये'च्या सेटवर अभिनेत्रीने राहुल महाजनच्या मारलं थोबाडीत, समोर आलं कारण
चार वर्षात एवढी बदलली सलमान खानची मुन्नी, एकदा फोटो पाहाच
VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप