'तुला थोबडवणार...', मराठीविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुमार सानूंच्या मुलाविरोधात मनसे आक्रमक

'तुला थोबडवणार...', मराठीविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुमार सानूंच्या मुलाविरोधात मनसे आक्रमक

सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझन (Bigg Boss Season 14) मध्ये आधीच्या सीझन्सप्रमाणेच वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. सध्या गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्या वादाची चर्चा सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझन (Bigg Boss Season 14) मध्ये आधीच्या सीझन्सप्रमाणेच वादग्रस्त वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. सध्या गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्या वादाची चर्चा सुरू आहे. मात्र या त्रिकुटाचा वाद जान कुमार सानूला अडचणीत आणणारा ठरू शकतो. त्याने निक्की आणि राहुलशी वाद घालताना मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेकांनी त्याचा निषेध केला आहे. केवळ मराठी कलाकारांनीच नव्हे तर राजकीय पक्षांनी देखील जान कुमार सानूला लक्ष्य केले आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कुमार सानूंच्या या मुलाला खास मनसे शैलीत धारेवर धरले आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, 'जान कुमार सानू. मराठी भाषेची याला चीड येते म्हणे.अरे तू कीड आहेस मोठी. मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला', असं ट्वीट करत खोपकर यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.

त्यांनी आणखी एक ट्वीट करत जान सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणाआर लवकरच आता आम्ही मराठी.'

दरम्यान शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाइक यांनी देखील, जान कुमार सानूला स्पर्धेतून वगळावं अशी मागणी केली आहे. ही बाब कदापि खपवून घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया सरनाइक यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राहुल वैद्य, निक्की तांबोली आणि जान कुमार सानू यांच्यातील संभाषणा दरम्यान हा प्रकार घडला. सुरुवातीला निक्की आणि जान यांच्यामध्ये चांगली मैत्री होती, पण त्यांच्यात काहीतरी बिनसले आहे. निक्की आणि राहुलची मैत्री चांगली झाली आहे. निक्की जेव्हा राहुल वैद्यशी मराठीत बोलते, तेव्हा ती जानला देखील मराठीत काहीतरी सांगते. त्यावेळी तो तिला मराठीत बोलू नकोस असं चिडून सांगतो. असं केल्यामुळे त्याला चीड येते असं देखील तो म्हणतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 1:39 PM IST
Tags: bigg boss

ताज्या बातम्या