मुंबई, 12ऑक्टोबर: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3)घरात टास्क दरम्यान सदस्य एकमेकांवर नाराज नाही झाले किंवा त्यांच्यात मतभेद नाही झाले असे कमीच दिसून येते. काही ना काही कारणास्तव वाद विवाद हे होतातच. असं काहीसं होताना आज पुन्हा एकदा दिसून येणार आहे असं वाटतं आहे. टास्कच्या मध्ये टीममधील चर्चेत सुरेखाताई (surekha kudchi angry) थोड्या नाराज असल्याचे दिसून येणार आहे.
सुरेखाताईंनी टीमला विचारले, “तुमचं काय ठरतयं मग. कसं करायचं”. यावर मीनल म्हणाली, “जेव्हा बजर वाजेल तेव्हा आपण निर्णय घेऊ काय करायचे. आता मी विचारत होते याची काय चर्चा झाली. तेव्हा उत्कर्ष त्याला कुठे ना कुठे convince करण्याचा प्रयत्न करतो आहे तू ये तुला सेफ करू. उत्कर्षचं हेचं सुरू आहे तो प्रत्येकाला वेगवेगळी कहाणी सांगतो आहे.
View this post on Instagram
त्यावर तृप्तीताई म्हणाल्या, “पण आता तर ते म्हणाले की त्यांनी विकासला सांगितला सुरेखाताईंना पाठवा”. त्यावर विकास म्हणाला “दादुस आमचं ठरलेलं आहे”. त्यानंतर प्रत्येकाने त्यांची त्यांची नावं नावं दिली... मीनलने आविष्कारचे नाव घेतले, तृप्ती देसाई यांनी सुरेखाताईंचे नाव घेतलं, विशाल म्हणाला आविष्कार. बहुमताने आविष्कार दारव्हेकरच नाव पुढे आल्यामुळे सुरेखा ताई म्हणाल्या मला माहिती होतं हे म्हणूनच....” यानंतर त्या चिडून तिथून तडकाफडकी निघून गेल्या. यानंतर आता नक्की काय झालं ? कळेलच. दिवसेंदिवस खेळ रंजक होत आहे. जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक वाटेल ते करण्यास तयार आहे. घऱात आता दोन ग्रुप देखील पडले आहेत. त्यातच आदिश वैद्यने देखील घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे या नव्या सदस्याच्या येण्यामुळे घरात काही नवीन वातावरण पाहायला मिळणार का याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
आता आजच्या भागात काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment