मुंबई, 17 जुलै : सध्या Bigg Boss Marathi चं दुसरं पर्व सुरू आहे. घरातील वाद, रुसवे-फुगवे यामुळे सध्या वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. याआधी आलेलं पहिलं पर्व सुद्धा खूप गाजलं होतं. यावेळी सर्वात जास्त चर्चेत राहीलेले स्पर्धक म्हणजे, पुष्कर जोग आणि सई लोकुर. त्यांच्यातली वागणं बोलणं याची चर्चा त्यावेळी खूप झाली. घरातून बाहेर पडल्यानंतरही हे दोघं अनेकदा एकत्र दिसले. त्यानंतर आता काही दिवसांपासून सई-पुष्कर यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे पुष्करच्या वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. मात्र आता यावर पुष्करनं मौन सोडलं आहे.
पुष्कर आणि जास्मिन यांच्या नात्यात दुरावा येण्यामागे सई मुख्य कारण असल्याची चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहे. पुष्करनं काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळीच्या बर्थ डे पार्टीमध्ये सुद्धा त्याची पत्नी जास्मिन कुठेही दिसली नव्हती. त्यामुळे पुष्कर आणि जास्मिन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान जास्मिनं सोशल मीडियावरुन तिचे आणि पुष्करचे अनेक फोटोही डिलीट केल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही, तर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चांही सुरू आहेत. त्यानंतर नुकतचं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पुष्करनं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फोर्ब्स यादीत येऊनही खूश नाही अक्षय कुमार, जास्तीच्या पैशांसाठी करतोय 'हे' काम
पुष्कर म्हणाला, ‘ माझ्या आणि पत्नीच्या नात्याबाबत सुरू असलेल्या या सर्व चर्चा निव्वळ अफवा असून त्याद्वारे माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर अशा अफवा पसरवण्यासाठी या ट्रोलर्सला नक्की कोण पैसा पुरवतं कोणास ठाऊक, आमच्या नात्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही. त्यामुळे कोणीही त्यावर विश्वास ठेऊ नये.’
'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जास्मिननं सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या काही सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्यात मतभेद झाल्याचं दिसत असून त्याविषयी जास्मिनला विचारलं असता, ‘आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पण मी एक सबल स्त्री असल्यानं हे गरजेच नाही की आम्ही दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करायला हवं. 'फादर्स डे'ला माझ्या मी वापरलेला motherasfather हा हॅशटॅग हा त्याचाच एक भाग आहे. मी कोणावरही अवलंबून नाही आणि मी माझ्या मुलीची पूर्ण जबाबदारी घेऊ शकते. त्यामुळे असं म्हणणं अजिबात चुकीचं नाही. पण त्यावरून आमच्यात वाद आहेत या निकषांवर पोहोचू नये’ असं जास्मिननं टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
मुंबईच्या रस्त्यावर भेळपुरी खाताना दिसली अर्जुन रामपालची प्रेग्नंट गर्लफ्रेंड
=====================================================================
कंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा