'बिग बॉस' फेम अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक; कारण ऐकून व्हाल थक्क

'बिग बॉस' फेम अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक; कारण ऐकून व्हाल थक्क

विकास पाठक (Vikas Pathak) हा ऐन कोरोना(corona pandemic) काळात आंदोलन करत होता.

  • Share this:

मुंबई, 8 मे-  कलर्स वाहिनीवरील बिग बॉस (Bigg Boss) या शोमुळे प्रसिद्धीस आलेला विकास पाठक याला आज मुंबई मध्ये अटक करण्यात आलं आहे. विकास पाठक (Vikas Pathak)  हा ऐन कोरोना काळात आंदोलन करत होता. हे आंदोलन 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्या यासाठी होतं. मुंबईतील शिवाजी पार्क येथे हे आंदोलन चालू होतं. सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरु असताना विकासचं आंदोलन चालू होतं. आज अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विरल भयानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये विकासला अटक करण्यात आलेलं दिसत आहे. विकास पाठक हे ‘हिंदुस्तान भाऊ’ म्हणून ओळखले जातात. बरेच लोक त्यांना याच नावाने ओळखतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे, ते म्हणत आहेत ‘हे सर्व मी माझ्यासाठी नाही करत आहे. हे मी फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी करत आहे. हे मी तुमच्या मुलाबाळांसाठी करत आहे.’ विकास पाठक यांनी हे आंदोलन बारावीच्या परीक्षा रद्द व्हाव्या आणि विद्यार्थ्यांची फीसुद्धा माफ व्हावी यासाठी केलं होतं.

(हे वाचा:'तू खरंच पस्तीशी ओलांडली आहेस?'; शेफालीचं सौंदर्य पाहून चाहत्यांना पडला प्रश्न  )

विकास पाठक ‘बिग बॉस 13’ मध्ये झळकले होते. ते सतत आपल्या व्हिडीओ आणि विधानांच्या माध्यमातून चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. देशावर निशाना साधणाऱ्या लोकांना ते खडे बोल सुनावताना दिसतात. यासाठी त्यांची खास शैली प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना इन्स्टाग्रामवरून सस्पेंडदेखील करण्यात आलं आहे.

(हे वाचा: सोनू सूदला बसला मानसिक धक्का; अथक प्रयत्नानंतरही नाही वाचू शकले मुलीचे प्राण )

गेल्यावर्षी त्यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि एकता कपूर यांच्या वेबसिरीजवर सुद्धा निशाना साधला होता. तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्यला ISI कडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं देखील म्हटलं होतं. ते मूळचे मुंबईचेच आहेत. विकास जयराम पाठक असं त्यांच नाव आहे. मात्र देशभक्तीवरील त्यांचे व्हिडीओ पाहून लोकांनी त्यांना हिंदुस्तान भाऊ म्हणण्यास सुरुवात केली आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 8, 2021, 7:16 PM IST

ताज्या बातम्या