मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss फेम उर्वशी ढोलकियाच्या कारला भीषण अपघात; स्कूल बसने दिली धडक

Bigg Boss फेम उर्वशी ढोलकियाच्या कारला भीषण अपघात; स्कूल बसने दिली धडक

उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया

Bigg Boss fame Urvashi Dholkia Car Accident: मनोरंजन क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाचा गंभीर कार अपघात झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई,5 फेब्रुवारी- मनोरंजन क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाचा गंभीर कार अपघात झाला आहे. अभिनेत्री मुंबईतील एका स्टुडिओमध्ये जात असताना हा अपघात झाला आहे. लहान मुलांच्या स्कुल बसने उर्वशीच्या कारला धडक दिली आहे. ही धडक फारच जोरदार असल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

अभिनेत्री उर्वशी ढोलकीया मुंबईतील मीरा रोडवर स्थित असणाऱ्या स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी जात होती. दरम्यान अभिनेत्रीला एका स्कुल बसने जोरदार धडक दिली. ही धडक फारच भयानक होती. सुदैवाने उर्वशी आणि तिचा संपूर्ण स्टाफ अगदी सुखरुप आहे. उर्वशीने स्कुलबसविरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीय. तिच्या मते हा केवळ एक अपघात होता. आणि आपण एकदम सुखरुप असून काळजी करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

(हे वाचा:Bigg Boss16 फेम शालिन भनौतची एक्स-पत्नी थाटणार नवा संसार; लग्नानंतर सोडणार देश )

कोण आहे उर्वशी ढोलकीया?

उर्वशी ढोलकीया टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. उर्वशीने खलनायिका साकारत आपली खास ओळख निर्माण केली आहे. उर्वशीचा मोठा चाहतावर्ग आहे. उर्वशी ढोलकीया बिग बॉस 6 ची विजेती ठरली होती. या शोमुळे तिला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय अभिनेत्री 'कसोटी जिंदगी की, आणि नागिनसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे.

उर्वशी ढोलकीया आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशीने अवघ्या 16 व्या वर्षी लग्न करत संसार थाटला होता. इतकंच नव्हे तर 17 व्या वर्षी अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर उर्वशीने पतीसोबत घटस्फोट घेतला होता. अभिनेत्रीने एक सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे.

उर्वशी ढोलकीया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. उर्वशीला एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. दोन लेकांची आई असणारी उर्वशी आजही अतिशय फिट आणि स्टायलिश आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आपलं वजनसुद्धा कमी केलं आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment