Home /News /entertainment /

उर्फीचा कहर! ड्रेसला एकमेव धाग्याने जोडलंय आणि डोक्यावर मांडलाय सेप्टीपिनांचा बाजार

उर्फीचा कहर! ड्रेसला एकमेव धाग्याने जोडलंय आणि डोक्यावर मांडलाय सेप्टीपिनांचा बाजार

यावेळी उर्फी जावेदच्या ड्रेससोबत तिच्या हेअर स्टाईलनं देखील सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. कुणी केसात गजरा तर कुणी फुलं माळत पण उर्फीनं हे काय नवीन केलं...जरा पाहा

  मुंबई, 28 मार्च- उर्फी जावेद ( urfi javed ) तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी उर्फीच्या ड्रेससोबत तिच्या हेअर स्टाईलनं देखील सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. तिचा हा नवीन लुक पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो की, तिन नेमकं काय घातलं आहे शिवाय ही कुठली हेअर स्टाईल( urfi javed new look ) आहे. उर्फी जावेदच्या ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर, नेहमीप्रमामे तिचा ड्रेस बोल्ड आणि तितकाच सेक्सी आहे. तिच्या ड्रेसच्या पुढच्या बाजूला मोठा कट आहे. तिचा हा ड्रेस पाहून एक प्रश्न पडला आहे की, हा ड्रेस तिच्या अंगासोबत राहिला कसा आहे. कारण उर्फीचा हा ड्रेस पाहिल्यानंतर लक्षात येते की फक्त एका धाग्याच आधार तिच्या ड्रेसला आहे. वाचा-होम मिनिस्टरमध्ये 11 लाखांची पैठणी मिळणार..सुचित्रा बांदेकरांचा हा आहे राग उर्फीनं या ड्रेसवर गोल्डन रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहे. तसेच तिच्या या सुपर सेक्सी लुकप्रमाणे तिच्या मेकअप देखील तितकाच ग्लॅम आहे. आयलयानर, ब्लशर आणि न्यूड लिपस्टिकमध्ये उर्फी नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. सेफ्टी पिन वापरून केली नवीन हेअर स्टाईल उर्फी जावेद नेहमी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी तिची हेअर स्टाईल देखील चर्चेचा विषय ठकली आहे. कारण देखील तसं आहे, ज्या  सेप्टी पिनचा वापर आपन साडी असेल किंवा ओढणी पिनअपसाठी करतो त्याचा वापर तिनं चक्का केस सजवण्यासाठी केला आहे. तिनं एका उंच बन घातला आहे आणि त्यामध्ये सेप्टी पिन लावल्या आहेत. आतापर्यंत तुम्ही केसात गजरा, फुले माळ्याचं पाहिलं असेल मात्र उर्फीनं एक नवीन ट्रेंड आणला आहे. अशा कल्पना फक्ता उर्फीच्या डोक्यात येऊ शकतात..हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे लक्षात येते. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच चर्चेत आला आहे.
  उर्फीची ही नवीन हेअर स्टाईल पाहून नेटकरी मात्र कोमात नेहमी उर्फीच्या कपड्याची चर्चा होते मात्र यावेळी तिच्या हेअर स्टाईलने सर्वांना धक्काच दिला आहे. तिच्या केसातल्या सेप्टी पिना पाहून एक नेटकऱ्याने म्हटलं आहे की, हा नवीन कार्टून कुठुन आला..तर आणखी एकानं म्हटलं आहे की, कपड्यांपर्यंच ठीक होतं आता ही केसात पण पिना अडकवत आहे..अशा अनेक कमेंट तिच्या या नवीन लुकवर येत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या