कलर्स वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रतीक आणि उमर एका टास्क दरम्यान समोरासमोर दिसत आहेत. दोघांसमोर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील जेठालालची क्रश बबिता अर्थातच मुनमुन दत्ता उभी आहे. हे दोघेही मुनमुनला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न आहेत. प्रोमोमध्ये, दोघेही त्यांचे शर्ट काढतात आणि सिक्स पॅक्स दाखवताना दिसतात. यानंतर प्रतीक आपली पॅन्ट काढताना दिसतो. हे पाहून मुनमुन आपल्या डोळ्यांवर हात ठेवते'. असा हा प्रोमो पाहायला मिळत आहे. (हे वाचा:अमृता रावने 9 वर्षानंतर शेअर केला लग्नाचा फोटो,असा होता अभिनेत्रीचा वेडिंग LOOK ) हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्स या तिघांचंही कौतुक करत आहेत. कोणाला मुनमुनच्या सौंदर्याची भुरळ पडलेय, तर कोणाला प्रतीक आणि उमरच्या टोन्ड बॉडीची. नुकतंच याशोमध्ये निकी तांबोळीसुद्धा सहभागी झाली होती. दरम्यान निकी आणि प्रतीकला लंच डेटचा टास्क देण्यात आला होता. यावेळी निकीने प्रतीकसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv shows