Home /News /entertainment /

'कपड्यांची बचत तुझ्याकडून शिकावी', 'मिनी स्कर्ट' घालून डान्स करणारी रश्मी देसाई ट्रोल, पाहा VIDEO

'कपड्यांची बचत तुझ्याकडून शिकावी', 'मिनी स्कर्ट' घालून डान्स करणारी रश्मी देसाई ट्रोल, पाहा VIDEO

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री (Tv Actress) रश्मी देसाई (Rashmi Desai) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

  मुंबई, 8 मे : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री (Tv Actress) रश्मी देसाई (Rashmi Desai) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. सतत आपल्या हॉट फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेतसुद्धा असते. चाहते रश्मीचं कौतुक करतात. तर दुसरीकडे इतर युजर्स तिच्या हॉट अंदाजामुळे तिला ट्रोलसुद्धा करत असतात. नुकताच रश्मी देसाईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओ मध्ये ती धम्माल डान्स करताना दिसत आहे. तर यात रश्मीने अतिशय मिनी स्कर्ट घातला आहे. यावरून युजर्स तिला ट्रोल (Trolled On Social Media) करत आहेत.
  बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाई नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ती सतत आपल्या हॉट फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांचा संपर्कात असते. चाहते सोशल मीडियावर तिला भरभरून दाद देत असतात. तर काही युजर्स ट्रोल देखील करत असतात. नुकताच रश्मीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये रश्मी कार्डी बी च्या ‘UP’ या गाण्यावर धम्माल डान्स करत आहे. (हे वाचा:बाळासाठी आईचं दूध किती महत्वाचं? अनिता हसनंदानीने सांगितलं 'स्तनपान'चं महत्व  ) या व्हिडीओ मध्ये रश्मीने अतिशय मिनी स्कर्ट घातला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच पसंत पडत आहे. मात्र ट्रोलर्सने रश्मीला चांगलचं निशाण्यावर घेतलं आहे. रश्मीच्या ड्रेसवर कमेंट करत एका युजरनं म्हटलं आहे, ‘कपड्यांची बचत कशी करावी हे तुझ्याकडून शिकावं’ तर काही युजर्सनी कोरोना आहे घरात राहा असा सल्ला देखील दिला आहे. तर काहींना यावेळी सिद्धार्थ शुक्लाची सुद्धा आठवण आली आहे.’
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Instagram post, Marathi entertainment, Tv actress

  पुढील बातम्या