मुंबई, 12 डिसेंबर: बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Siddharth Shukla) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती सिद्धार्थवर आरोप करीत आहे की, त्याने एका गरीब माणसाला विनाकारण मारहाण केली आहे आणि तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आहे. सिद्धार्थ यावर स्वत:ची बाजू मांडताना सांगत आहे की, त्या व्यक्तीने यापूर्वी त्याला चाकू दाखवत धमकावलं होतं. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्लासुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड करणार्या व्यक्तीकडून व्हिडिओ कॅमेरा हिसकावताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याच्या आधारे सिद्धार्थवर असा आरोप केला जात आहे की त्यानं दारु पिऊन एका गरीब व्यक्तीला विनाकारण मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सिद्धार्थ शुक्लाच्या बर्थडेच्या रात्रीचा आहे. परंतु, हा व्हिडिओ व आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही. तसेच, या संदर्भात अद्याप सिद्धार्थ शुक्ला कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सिद्धार्थच्या वाढदिवसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला आपल्या वाढदिवसाचा केक कापत आहे. त्याचवेळी, त्याचे सर्व मित्र त्याच्यासाठी बर्थडेचं गाणं गातात. विशेष म्हणजे शहनाज गिल मोठ्या आवाजात वाढदिवसाचे गाणं गाताना दिसते.