मुंबई, 21 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. राज कुंद्राचं पॉर्नोग्राफी प्रकरण असो किंवा बहिणीचे अफेअर्स शिल्पा नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. नवऱ्याच्याही आधी शिल्पाचं तिच्या बहिणीवर नितांत प्रेम आहे. लहान बहिणीला शिल्पा फुलासारखं जपते. दोघींचं बॉन्डिंग अनेकवेळा पाहायला मिळालं आहे. आजवर तिनं शमितासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. मात्र बहिणीसाठी शिल्पा तिचं पहिलं प्रेम कधीच परत आणू देऊ शकत नाही. शमिता शेट्टी केवळ 18 वर्षांची असताना तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा अपघाती मृत्यू झाला होता. आज किती कोटींची मालकीण असली, शिल्पासारखी प्रेम करणारी बहिण असली तरी शमिता आजही बॉयफ्रेंडच्या आठवणीत ठसाठसा रडते. शमिताच्या पहिल्या बॉयफ्रेंडबरोबर नेमकं घडलं? पाहूयात.
अभिनेत्री शमिता शेट्टीनं अभिनय क्षेत्रात फारसं काम केलं नसलं तरी सौंदर्य, बिझनेस आणि शिल्पा शेट्टीची बहिण म्हणून शमिताची ओळख आहे. मध्यंतरी शरारा शरारा हे शमिताचं गाण सुपरहिट ठरलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. शमिता शेट्टीचं नाव आजवर अनेक कलाकारांबरोबर जोडलं गेलं. तिच्या बॉयफ्रेंड्सची लिस्ट फार मोठी असल्याचं म्हटलं जातं.
हेही वाचा - 'या' 2 अभिनेत्यांनी दाखवली राज कुमारला त्याची जागा; अशी उतरवली होती अभिनेत्याची घमेंड
बिग बॉस ओटीटीमध्ये असताना शमिताचं नाव अभिनेता राकेश बापटबरोबर जोडलं गेलं होतं. राकेश आणि शमिता यांचं एकमेकांवर प्रेम होतं. आधीच एक लग्न झालेल्या राकेशवर शमिताचा जीव जडला होता. बिग बॉस ओटीटीमध्ये दोघांची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती. दोघांचं प्रेम आणि भांडणं अशा दोन्ही बाजू तिथे पाहायला मिळाल्या होत्या. पण बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर काही महिन्यातच दोघांचं ब्रेकअप झालं. शमितानं स्वत: तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला होता.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात असताना शमिता आणि अभिनेत्री नेहा भसीन यांची चांगलीच मैत्री झाली होती. दोघी अनेक गोष्टी शेअर करत. एकेदिवशी शमितानं तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडच्या अपघाती मृत्यूबद्दल खुलासा केला होता. त्याचप्रमाणे ती इतकी भावुक का आहे याचं देखील स्पष्टीकरण तिनं दिलं होतं.
शमिता पहिल्या बॉयफ्रेंडच्या निधनाबद्दल बोलताना ढसाढसा रडली होती. तिनं सांगितलं होतं की,मी 18 वर्षांची असताना माझं एका मुलावर प्रेम होतं. तो देखील माझ्यावर तितकंच प्रेम करायचा. पण एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. तो गेल्यानंतर मला मोठा धक्का बसला होता. मी पूर्णपणे तुटले होते. त्यामुळेच मी अनेक वर्ष माझ्या आयुष्यात कोणालाही येऊ दिलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News