मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss मधील या स्पर्धकाचा सोशल मीडियाला केला 'राम राम', कारणही केलं जाहीर

Bigg Boss मधील या स्पर्धकाचा सोशल मीडियाला केला 'राम राम', कारणही केलं जाहीर

बिग बॉस 11 मधील स्पर्धक सपना चौधरी (Sapna Choudhary break from social media) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती फोटोज त्याचप्रमाणे ट्रेंडिंग रील्सही नेहमी शेअर करते. मात्र तिने सोशल मीडियावरुन काहीसा ब्रेक घेतला आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 09 मार्च: बिग बॉस 11 मधील स्पर्धक सपना चौधरी (Sapna Choudhary break from social media) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती फोटोज त्याचप्रमाणे ट्रेंडिंग रील्सही नेहमी शेअर करते. दरम्यान तिने सोशल मीडियाला राम राम केल्याचं समोर आलं आहे. हरयाणाची डान्सिंग क्वीन असलेल्या सपना चौधरी (Sapna Choudhary Instagram) हिने स्वत: याबाबत इन्स्टाग्राम वरुन माहिती दिली आहे. मात्र तिने कायमचं इन्स्टाग्रामला अलविदा केलं नसून तिनेकाहीसा ब्रेक घेतला आहे. याचं कारणंही सपनाने स्पष्ट केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक स्टोरी पोस्ट केली आहे.

बिग बॉस 11 ची स्पर्धक राहिलेल्या सपनाने इन्स्टावर एक स्टोरी पोस्ट करत असं म्हटलं आहे की, 'राम राम, तब्येत ठीक नसल्याने अपडेट असणार नाही. माफ करा लवकरच भेटू..' गेल्या काही दिवसांपासून सपना चौधरी हिची तब्येत बिघडली आहे. याबाबत काही सविस्तर माहिती समोर आली नसली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार मध्यप्रदेशात एका कार्यक्रमादरम्यानच सपनाची तब्येत बिघडली होती. एका लाइव्ह कार्यक्रमादरम्यान तिच्या पोटात अचानक दुखू लागले होते. 'दिल्ली की गर्मी' या गाण्यावर डान्स करताना ही घटना घडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र अधिक काळजी घेण्यासाठी सपनाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-'या' फोटोंमुळे पवनदीप-अरुणीता रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

सपना चौधरीचे डान्स व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिचे लाखो चाहते आहेत. सपनाच्या आजारपणामुळे हे चाहते तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी याकरता प्रार्थना करत आहेत.

तिचे इन्स्टाग्रामवर 4.8 मिलियन फॉलोअर्स असून तिच्या प्रत्येक पोस्टवर लाइक्सचा पाऊस पडतो. अलीकडेच तिचं 'लाल दुपट्टा' हे गाण रीलिज झालं आहे. या गाण्याबाबतची पोस्ट सपनाची इन्स्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट आहे. त्यानंतर तिने इन्स्टावरुन ब्रेक घेतला असल्याची पोस्ट केली आहे.

First published:

Tags: Big boss, Bigg boss