मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

इंग्लिश गाण्यावर डान्स करताना Sapna Chaudhary चा Video Viral, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

इंग्लिश गाण्यावर डान्स करताना Sapna Chaudhary चा Video Viral, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

सुट्ट्यांचा मौसम सुरू (Holdiay Season 2021) असल्याने अनेक सेलिब्रिटीजसुद्धा त्यांच्या पर्यटनाच्या पोस्ट शेअर करत आहेत. हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhry Video) हिनेही अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: सुट्ट्यांचा मौसम सुरू (Holdiay Season 2021) असल्याने अनेक सेलिब्रिटीजसुद्धा त्यांच्या पर्यटनाच्या पोस्ट शेअर करत आहेत. हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhry Video) हिनेही अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच तिने बिचवर इंग्लिश गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर (Sapna Chaudhry Instagram) शेअर केला पण तो काही तिच्या चाहत्यांना आवडलेला दिसत नाही. त्यामुळे आता या बोल्ड व्हिडीओच्या पोस्टवर उलट-सुलट कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

बिग बॉस (Bigg Boss) या रिॲलिटी शोमध्ये तिने घेतलेल्या सहभागामुळे सपना घरोघरी पोहोचली. या शोमध्ये तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. एवढंच नाहीतर या शोनंतर तिच्या लूकमध्ये झालेल्या बदलांमुळे तिचे चाहतेही अवाक् झाले. एरवी देशी अवतारात दिसणाऱ्या सपनाने एकदम मॉर्डन रूप (Sapna Chaudhary Modern Look) धारण केलं.

इतर सेलेब्सप्रमाणे सपना तिच्या सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असते. आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर सपनाने नुकताच एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात सपना चौधरी समुद्रकिनारी ट्रेडिंग इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पांढऱ्या वेस्टर्न आऊटफिटमधील बोल्ड लूक आणि तिचा डान्स पाहून चाहते एकदम आश्चर्यचकित आहेत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये सपना समुद्राच्या लाटांच्या आणि इंग्लिश गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओसाठी सपनाने टाकलेलं कॅप्शनही हटके आहे. ‘जर यालाच प्रेम म्हणत असतील तर मला हेच हवंय,’ असं तिने लिहीलं आहे.

हे वाचा-'83' चित्रपट थिएटर नंतर आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार का? रंगली चर्चा

सेलिब्रिटीजच्या सर्व पोस्ट फॅन्सना आवडतातच असं नाही. तसंच काहीसं या पोस्टबाबतही झालं आहे. फॅन्सच्या कमेंट अनेकदा सेलिब्रिटीजना आरसा दाखवतात, तसंच यावेळी झालं आहे. एका फॅनने लिहीलं आहे की, 'आता तुझं वय झालंय, आम्हाला बोअर करू नकोस.' तर दुसऱ्या फॅनने लिहिलं आहे की, 'इंग्लिश गाण्याचे व्हिडिओ नको बनवत जाऊस, तू देशी गाण्यांवरच नाचतना चांगली वाटतेस'. तर एका फॅनने थेट लिहीलं आहे की, 'तुझी प्रसिद्धी अशामुळे खरंच कमी होईल.'

काही फॅन्सना सपनाचा हा अवतार आवडला आहे. तर काही जणांनी तिला ट्रोल केलं आहे. सपनाने देशी अवतार सोडून केलेला मॉर्डन लूक अनेक फॅन्सचा पचनी पडलेला नाही. त्यामुळे काही फॅन्सनी या पोस्टवर वाईट कमेंट केल्या आहेत. सपना यातून नक्कीच योग्य ते घेईल अशी आशा करूया.

First published: