Home /News /entertainment /

शमिता शेट्टीसोबत Break-Up च्या चर्चेवर राकेश बापटची समोर आली पहिली प्रतिक्रिया

शमिता शेट्टीसोबत Break-Up च्या चर्चेवर राकेश बापटची समोर आली पहिली प्रतिक्रिया

शमिता शेट्टी आणि राकेश बापट (Raqesh Bapat Shamita Shetty Films) मागच्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. यावर पहिल्य़ांदाच राकेश बापटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 मार्च- शमिता शेट्टी आणि राकेश बापट (Raqesh Bapat Shamita Shetty Films) मागच्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. मात्र शमिता आणि राकेशने ब्रेकअपच्या(Shamita Raqesh Breakup) बातम्या फेटाळून लावल्य़ा आहेत. शिवाय आमचं नातं आता पहिल्यापेक्षाही घट्ट झाल्याचे या कपलनं म्हटलं आहे. यानंतर एका रिपोर्टने दावा केले आहे की, या दोघांच्यात एक मोठं भांडण झालं आहे. आता या सगळ्यानंतर राकेश बापटनं पहिल्यांदाचा प्रतिक्रिया दिली आहे. राकेश बापट आणि शमिता शेट्टी (Raqesh Bapat Shamita Shetty Photos) यांच्या फॅनने शुक्रवारी एक मोठी नोट शेअर केली आहे. ही नोट राकेशने त्याच्या ट्वीटर अंकाऊटवर शेअर केली आहे. या नोटमध्ये नेटकऱ्यांनी या कपलच्या वैयक्तिक आय़ुष्याचा आदार करावा असं म्हटलं आहे. फॅनने त्याच्या ओपन लेटरची सुरूवात, कृपया आपल्या सीमा ओळखा.. अशी केली आहे. त्याने हे लेटर शमिता व तिची आई सुनंदा शेट्टी तसेच राकेशला देखील टॅग केले. राकेशने या ट्वीटला रिट्वीट करत वर्ड असं लिहिलं आहे. वाचा-Video : या अभिनेत्रीनं पहिल्यांदाच केल्या पुरणपोळ्या !कशा झाल्या ते पाहा.. या नोटमध्ये लिहिले आहे ती, "कृपया आपल्या मर्यादा ओळखायला शिका. मी शरा-शमिता किंवा राकेशमध्ये जास्त रस घेणारी व्यक्ती नाही. राकेश (Raqesh Bapat) एक चांगला माणूस आहे, म्हणून मी त्याचे कौतुक करतो. जो नेहमी आपल्या जोडीदाराबद्दल आदर दाखवतो. अलीकडे सोशल मीडियावर जे काही घडत आहे, त्यामुळे मी चकित झालो आहे आणि विचलित झालो आहे." वाचा-'टॅलेंट को छुपा नही सकते', सिद्धार्थ चांदेकरच्या रीलवर चाहत्याची भन्नाट कमेंट सेलब्स म्हणजे वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडणे नव्हे पुढे या नोटमध्ये म्हटलं आहे की, राकेश आणि शमिता पोस्ट का करत नाहीत? तो पोस्ट का करत नाहीत ? खरचं त्यांचे ब्रेकअप झालं आहे क? तो फक्त पोस्ट का करत आहे? ते एकत्र आहेत का? त्यांच्यात काही भांडण सुरू आहेत का? तुम्ही लोक गंभीर आहात का!!!! ते सेलेब्स आहेत, याचा अर्थ असा नाही की त्याने आपले वैयक्तिक आयुष्य आपल्यासाठी सार्वजनिक केले पाहिजे. शमिता आणि राकेशने अफवा लावल्या फेटाळून या नोटमध्ये पुढे म्हटलं आहे की, शमिता (Shamita Shetty Photos) आणि राकेश काही बोलत नाहीत याचा अर्थ असा होच नाही की, त्यांच्याविषयी काहीही बोलणं. शमिता शेट्टी आणि राकेश बापट एका अवॉर्ड शोमध्ये हातात हात घालून आले आणि त्यांनी पुन्हा एकदा ब्रेकअपच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या