Home /News /entertainment /

VIDEO: सिद्धार्थ गेल्यानंतर आईचा पहिला शब्द...आणेल डोळ्यात पाणी; पाहा काय म्हणाला राहुल वैद्य

VIDEO: सिद्धार्थ गेल्यानंतर आईचा पहिला शब्द...आणेल डोळ्यात पाणी; पाहा काय म्हणाला राहुल वैद्य

सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या अनेक जवळच्या मित्रमैत्रीणींनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. बिग बॉस फेम अभिनेता आणि गायक राहूल वैद्य (Rahul Vaidya) आणि सिद्धार्थ फारच जवळचे मित्र होते. सिद्धार्थच्या आईला भेटल्यानंतर त्यालाही अश्रू अनावर झाले नाहीत.

पुढे वाचा ...
    मुंबई 5 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 3 सप्टेंबर रोजी मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला. अनेक टीव्ही स्टार्स त्याला निरोप देण्यासाठी स्मशानभूमीवर पोहोचले होते. सिद्धार्थच्या कुटुंबियांसह, निकटवर्तीय मित्र मैत्रिणी आणि चाहते सर्वांनाच सिद्धार्थचं जाणं पचवणं कठीण झालं आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या अनेक जवळच्या मित्रमैत्रीणींनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. त्याच्या पश्चात असलेली त्याची आणि दोन बहिणी यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. बिग बॉस फेम अभिनेता आणि गायक राहूल वैद्य (Rahul Vaidya) आणि सिद्धार्थ फारच जवळचे मित्र होते. तो ही पत्नी दिशा परमारसोबत घरी गेला होता. मात्र सिद्धार्थच्या आईला भेटल्यानंतर त्यालाही अश्रू अनावर झाले नाहीत. राहूलने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात सिद्धार्थच्या आईचे तो गेल्यानंतरचे पहिले शब्द राहूलने सांगितले आहेत. सिद्धार्थच्या आईचे शब्द ऐकून कोणालाही दुःख आवरणार नाही. राहूलने सांगितलं की, जेव्हा तो बातमी समजल्यानंतर त्यांना भेटायला गेला तेव्हा त्या म्हणाल्या, "आयुष्यात ऐकलं होतं की, कोणाचा तरूण मुलगा गेला. पण हे माझ्यासोबतच होईल असं कधी वाटलं नव्हतं. आता मी कोणासाठी जगू, सगळं संपलं."  पुढे त्याने हे ही सांगितलं की, शेहनाझ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. याशिवाय राहूलने त्याचा आणि सिद्धार्थचा बॉन्ड कसा होता. कसे ते भेटले होते हे ही सांगितलं आहे. सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. प्रथमदर्शनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही. आणखी तपासानंतर कारण स्पष्ट केलं जाणार आहे.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Entertainment, Sidharth shukla

    पुढील बातम्या