मुंबई, 28 एप्रिल : कलर्स वाहिनीवरील ‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या शोच्या स्पर्धकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. रोहित शेट्टी होस्ट (Host Rohit Shetty) असलेल्या या शोमध्ये राहुल वैद्य, निक्की तांबोळीपासून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ते सनाया इराणी इत्यादी कलाकार झळकणार आहेत. मात्र सध्या खास चर्चेत आहे तो म्हणजे ‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्य (Rahul Vaidya). ‘खतरों के खिलाडी 11’ या सीजनचा राहुल हा सर्वात महागडा स्पर्धक ठरल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
बिग बॉसमुळे राहुल वैद्यची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे शो मेकर्सला राहुलला मानधन म्हणून मोठी रक्कम द्यावी लागत आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, राहुलला एका एपिसोडसाठी 12 ते 15 लाख रुपये दिले जाणार आहेत.
त्याचबरोबर राहुल आणि दिशा परमारला डान्स शो ‘नच बलिये’ साठी सुद्धा विचारण्यात आलं होतं. मात्र राहुलने त्याला नकार दिला. कारण दिशा आणि राहुल लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल अजून काहीही खुलासा झालेला नाही. तोपर्यंत राहुल 'खतरों के खिलाडी'मध्ये स्टंट करताना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
तसंच राहुल वैद्यसोबत या शोमध्ये वरुण सूद, अभिनव शुक्ला, अर्जुन बिजलानी, सिद्धार्थ शुक्ला, सनाया इराणी, दिव्यांका त्रिपाठीदेखील स्टंट करताना दिसून येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आत्तापासूनचं याची उत्सुकता लागली आहे.
(हे वाचा:खरंच सलमाननं दिशा पटानीला किस केलं?; काय आहे त्या व्हायरल व्हिडीओचं सत्य )
काही दिवसांपूर्वी राहुलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं होता. त्यामध्ये राहुल आणि दिशा आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मधाणया’ या गाण्यावर डान्स करत होते. या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठी पसंतीही मिळत आहे.
(हे वाचा:'यात माझी काय चूक'; संतापलेल्या डॉक्टरनं अभिनेत्रीवर ठोकला मानहानीचा दावा.... )
'बिग बॉस 14' मध्ये राहुलने व्हेलेंटाईन डे चं औचित्य साधत दिशाला प्रपोज केलं होतं आणि याचं शोमध्ये दिशाने त्याला होकार देखील ofne होता. आता अनेक चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.