Home /News /entertainment /

बाप्पाच्या दर्शनासाठी श्वेता तिवारीच्या घरी 'बिग बॉस' स्पर्धकांची हजेरी

बाप्पाच्या दर्शनासाठी श्वेता तिवारीच्या घरी 'बिग बॉस' स्पर्धकांची हजेरी

१० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्न नाहीशी करण्यासाठी विघ्नहर्ता अगदी थाटामाटात विराजमान झाला आ

  मुंबई, 12 सप्टेंबर- गणेशोत्सव(Ganesh Chaturthi 2021) आनंदाचा, उत्साहाचा आणि आपल्या लोकांसोबत नाती अधिक घट्ट करण्याचा सोहळा असतो. गणरायाच्या आगमनाने वातावरण अगदी सकारात्मक बनत. त्यामुळे सर्वांना हा उत्सव हवाहवासा वाटतो. म्हणूनच सर्व कलाकारसुद्धा आपल्या शूटिंगमधून ब्रेक घेत बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. नुकताच बिग बॉस(Bigg Boss) फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अभिनेत्री सना मकबूल यांनी श्वेता तिवारीच्या(Shweta Tiwari) घरी बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली होती.
  १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्न नाहीशी करण्यासाठी विघ्नहर्ता अगदी थाटामाटात विराजमान झाला आहे. सर्व लोक बाप्पाच्या भक्तीत व्यग्र आहेत. अनेक लोक आपल्या मित्रपरिवारसोबत हा उत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे. (हे वाचा:अनुपमा' फेम निधी शाहने केलं क्लीन बोल्ड; अभिनेत्रीने चक्क बाथरूम PHOTO केले ...) अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकताच अभिनेत्री श्वेता तिवारीच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आहे. निक्कीने बाप्पाजवळ अगदी मनापासून प्रार्थनादेखील केली आहे. नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर निक्कीने आपला एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये ती बाप्पाजवळ प्रार्थना करत असल्याचं दिसून येत आहे. निक्कीने या फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, 'अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते'. (हे वाचा:Ganesh Chaturthi 2021: एकता कपूरच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी कलाकारांची हजेरी) निक्कीने मराठीतून दिलेलं कॅप्शन पाहून चाहते खुश झाले आहेत. तसेच निक्कीचं कौतुकही करत आहेत. निक्की नुकताच गणेशोत्सवानिमित्त श्वेता तिवारीच्या घरी गेली होती. यावेळी अभिनेत्री सना मकबूल आणि अभिनेता विशालसुद्धा उपस्थित होता. या तिघांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यांनंतर धम्मालही केली. हे तिघेही सध्या 'खतरों के खिलाडी'मध्ये एकत्र झळकत आहेत. या शोदरम्यानच यांची मैत्री घट्ट झाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment, Ganesh chaturthi

  पुढील बातम्या