Home /News /entertainment /

बिग बॉस फेम नीता शेट्टीचे बिग बींसोबतचे फोटो व्हायरल, समोर आलं ग्रेट भेटीमागचं मोठं कारण

बिग बॉस फेम नीता शेट्टीचे बिग बींसोबतचे फोटो व्हायरल, समोर आलं ग्रेट भेटीमागचं मोठं कारण

बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3) फेम अभिनेत्री नीता शेट्टीनं (Neetha Shetty) नुकतीच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भेट घेतली.

  मुंबई, 18 एप्रिल- बिग बॉस मराठी (bigg boss marathi 3) फेम अभिनेत्री नीता शेट्टीनं (Neetha Shetty) नुकतीच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विषेष म्हमजे या ग्रेट भेटींमागे कारण काय असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. नीतानं सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडिओ पोस्ट करत या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. नीता शेट्टीनं अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे फोटो व व्हिडिओ पोस्ट केला आहे. आयुष्यातील सगळ्यात सुंदर अनुभव असं म्हणत तिनं अमिताभ यांच्यासोबतचा कामाचा अनुभव शेअर केला आहे. नीतानं अमिताभ बच्चन यांच्यासोबत आरबीआयची एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीनिमित्त तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन करण्याची संधी मिळाली. याबद्दलचा आनंद तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा-एकदम कडSSक! मराठी नाटकाचा शो परदेशात हाऊसफुल्ल, सुबोध भावेने शेअर केला Photo बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात नीता शेट्टीची वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. ती बिग बॉस घऱात जास्त काळ टिकू शकली नाही पण तिच्या खेळानं नक्कीच सर्वाचं मन जिंकल होतं. हिंदी सृष्टीत नाव कमावलेल्या नीता शेट्टीने मराठी चित्रपट क्षेत्रातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ममता, तुम बिन जाऊं कहां, बनू मै तेरी दुलहन, मानो या ना मानो, ढुंढ लेगी मंजिल हमें, सीआयडी, क्राईम पेट्रोल अशा अनेक हिंदी मालिकांमधून तिने विविधांगी भूमिका बजावल्या आहेत.
  मराठी चित्रपटात देखील तिला सुबोध भावे, स्वप्नील जोशी सोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. फुगे, सर्व लाईन व्यस्त आहे, तुला कळणार नाही अशा काही मराठी चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. गंदी बात या वेबसिरीजमधून ती प्रेक्षकांसमोर आली होती. फुगे हा तिने साकारलेला पहिला मराठी चित्रपट ठरला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या