मुंबई, 23 मार्च- बिग बॉसचा 16 वा सिझन चांगलाच हिट ठरला. यात शिव ठाकरेने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. शिवने शेवट्पर्यंत मजल मारत फर्स्ट रनर अप ठरला. त्याने विजेतेपद जिंकलं नसलं तरी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. शिवनं काही दिवसापूर्वी महागडी कार खरेदी केली होती आता त्यानं चक्क चहा विकायला सुरूवात केली आहे. विश्वास बसणार नाही, पण हे खऱं आहे.
शिव ठाकरेने आपला नवीन व्यवसाय सुरू केला आहे. शिवने मुंबईत 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' नावाचे रेस्टॉरंट उघडले आहे. त्याने हसलर हॉस्पिटॅलिटीशी कोलॅबरेट केलं आहे. विशेष म्हणजे याच कंपनीसोबत अब्दु रोझिकने मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंटही उघडले आहे, जे 'बर्गर' सर्व्ह करते.
वाचा-दोन दिवसांपासून 'ही' मराठी अभिनेत्री आजारी, मास्क घालण्याचं केलं आवाहन
शिवने नुकतेच या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले, ज्यात खाण्यापिण्याची सोय केली जाईल. त्याच्या या आउटलेटमध्ये तुम्हाला 25 पेक्षा जास्त प्रकारचे चहा आणि नाश्ता दिला जाईल. विशेष म्हणजे या लोगोमध्ये शिवचा फोटो लावण्यात आला आहे.सोशल मीडिया पोस्ट करत शिवनं त्याच्या या नवीन व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
शिव ठाकरेने काही दिवसापूर्वी महागडी कार घेतली होती. शिव ठाकरेच्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी शिव ठाकरेने पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून आपल्या गाडीचे स्वागत केले होते. तसेच त्याने आपल्या टीमसोबत केक देखील कापला होता. दोन सेकंड हँड कारनंतर शिव ठाकरेची पहिली नवीन कार पाहून त्याचे चाहतेही खूप खूश झाले होते.
बिग बॉस नंतर शिव त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करतोय. तो लवकरच 'खतरो के खिलाडी'मध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी त्याचे सगळे फॅन्स प्रचंड उत्सुक आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंत प्रत्येक कलाकार काहीना काही नवीन करायचा प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय आता बरेच कलाकरा हे व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. पहिला हा ट्रेंड फक्त बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत होता. आता मराठी कलाकार देखील व्यवसाय सुरू करताना दिसतात. विशेषता मराठी अभिनेत्री यामध्ये आघाडीवर आहेत. प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, निवेदिता सराफ, क्रांती अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा कशाचा ना कशाच तरी व्यवसाय आहे. सोशल मीडियावर देखील त्या याटं ब्रॅन्डिंग करताना दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.