मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'शो संपल्यानंतर आम्ही...'; बिग बॉस फेम सोनाली-जय रिलेशनमध्ये? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

'शो संपल्यानंतर आम्ही...'; बिग बॉस फेम सोनाली-जय रिलेशनमध्ये? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

jay dudhane and sonali patil

jay dudhane and sonali patil

जय दुधाणेला बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर लॉटरीच लागली. महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात जय दुधाणे दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  06 जानेवारी : बिग बॉस मराठीच्या 4 सीझनमधून अनेक स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक नवे चेहरे यानिमित्तानं पाहायला मिळाले. त्यातील काही नावं प्रेक्षकांच्या डोक्यात फिट झालीत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली पाटील. सोनालीनं बिग बॉस मराठी 4मध्ये चांगलाच कल्ला केला. भांडणं केली, मज्जा मस्ती केली. बिग बॉसमध्ये सोनाली पाटीलचं नाव अभिनेता विशाल  निकमबरोबर जोडलं गेलं होतं.मात्र विशालची सौंदर्या वेगळीच असल्याचं नंतर कळलं.  दरम्यान आता सोनाली पाटील आणि जय दुधाणे यांची चर्चा होतेय. सोनाली पाटील आणि जय दुधाणे रिलेशनमध्ये असल्याचा चर्चा सध्या सुरू आहेत.

जय दुधाणेला बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर लॉटरीच लागली. महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात जय दुधाणे दिसणार आहे. त्याचप्रमाणे जयचा नुकतचा 'गडद अंधार' हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. जय सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचा दिसत आहे. जयनं सिनेमाच्या प्रीमियरसाठी बिग बॉसमधील मित्रांना आमंत्रण दिलं होतं. अभिनेता सोनाली पाटील गडद अंधारच्या प्रीमियरला गेली होती. सिनेमा पाहून झाल्यानंतर सोनालीनं एक पोस्ट लिहिली ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा - Shiv The Boss : लाल मिरची पावडर चेहऱ्यावर, डोक्यात बादली फोडली; तरीही शिवच्या तोंडातून एक अक्षरही निघालं नाही!

सोनाली पाटीलनं जय दुधाणेबरोबरचा क्लोज फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत.  मित्राला मिळालेलं यश पाहून सोनाली फार खूश झाली. तिनं पोस्ट लिहित म्हटलं,  'बिग बॉसच्या घरात आम्ही अनोळखी व्यक्ती म्हणून भेटलो. त्यानंतर आम्ही बोलू लागलो आणि शेवटी आम्ही मित्र झालो. शो संपल्यानंतरही आमचं नातं कायम राहिलं. तुला आज मोठ्या पडद्यावर पाहून मला खूप आनंद झाला. यश मिळवण्याचा तुझा हा प्रवास कधीही थांबू देऊ नको. अभिनेता म्हणून तुझ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. नेहमी चमकत रहा. ऑल द बेस्ट'. या पोस्टच्या शेवटी सोनालीनं जयला 'आय लव्ह यू' म्हणत 'हार्ट इमोजी' शेअर केलेत. सोनालीच्या या रिअॅक्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सोनालीच्या या पोस्टवर जयनं देखील रिप्लाय दिलाय. 'अववsssसच स्वीटहार्ट' असं जयनं म्हटलं आहे. दोघांच्या या कृतीवरून चाहत्यांनी दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज बांधला आहे. दोघांची जोडी फार छान दिसतेय अशा कमेंट्सही चाहत्यांनी केल्या आहेत. एका युझरनं लिहिलंय, 'जय दुधाणे तुझ्या नव्या सुरूवातीसाठी तुझं अभिनंदन आणि सोनाली पाटील तुम्ही दोघेही एकत्र खूप छान दिसता'.

सोनाली  आणि जय बिग बॉस मराठी3मध्ये सहभागी झाले होते. दोघेही टॉप 6मध्ये गेले. सोनाली टॉप 6मधून बाहेर आली. शेवटी जय आणि विशाल निकम यांच्यात चुरस पाहायला मिळाली आणि विशाल निकम बिग बॉस मराठी 3चा विजेता ठरला.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news