• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss फेम अर्शी खानच्या कारला दिल्लीत अपघात; रूग्णालयात करण्यात आलं दाखल

Bigg Boss फेम अर्शी खानच्या कारला दिल्लीत अपघात; रूग्णालयात करण्यात आलं दाखल

बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री अर्शी खानचा (Arshi Khan) 22 नोव्हेंबर रोजी दिल्लीत अपघात झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री अर्शी खानचा (Arshi Khan) 22 नोव्हेंबर रोजी दिल्लीत अपघात झाला आहे. दिल्लीतील मालवीय नगरमध्ये अभिनेत्रीचा अपघात (Arshi Khan Accident) झाला आहे. ज्यामध्ये ती थोडक्यात बचावली. या अपघातात अर्शी खानला किरकोळ दुखापत झाली असून, तिला राजधानीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिच्यावर उपचार सुरू असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्शी खान तिच्या मर्सिडीज कारमध्ये होती. अपघात झाला तेव्हा ती तिच्या सहाय्यकासोबत होती. कारची धडक लागताच एअरबॅग्ज उघडल्या. त्यामुळे ती गंभीर जखमी होण्यापासून बचावली. अभिनेत्री गंभीर दुखापतीतून बचावली असली तरी छातीत दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. वाचा : जेनेलिया डिसूजाच्या 'परी' लुकने जिंकले चाहत्यांचे मन; PHOTO पाहून थक्क व्हाल अर्शी खानला बिग बॉस 11 मधून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली होती. यादरम्यान शोचा रनर-अप विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यांच्या मैत्रीची बरीच चर्चा झाली. शोमध्ये दीर्घकाळ टिकून राहिल्यानंतर ८३व्या दिवशी ती घरातून बाहेर पडली. वाचा :  रकुलप्रीत -जॅकी भगनानीशी कधी करणार लग्न? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन यानंतर ती बिग बॉस 14 मध्ये चॅलेंजर म्हणूनही दिसली होती. यादरम्यान, ती रुबिना पती अभिनेता अभिनव शुक्लासोबत जोरदार फ्लर्ट करताना दिसली. अर्शी जेव्हाही शोमध्ये दिसली तेव्हा ती पुरुष स्पर्धकांसोबत उघडपणे फ्लर्ट करताना दिसली आहे. यावेळी तिचा आणि विकासचा वाद चांगलाच गाजला होता. ज्यामुळे की बिग बॉसमध्ये चर्चेत आली होती. राखी सावंतच्या मैत्रीमुळे देखील यावेळी चर्चेत होती. बिग बॉसशिवाय 'द लास्ट एम्परर' या चित्रपटातूनही ती मोठ्या पडद्याकडे वळली आहे. याशिवाय तिने ' ‘सावित्री देवी कॉलेज और हॉस्पिटल्स’ में वह ‘विष’ या मालिकेतही काम केले आहे. अर्शी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांशी ती तिच्याशी संबंधित लहान-मोठे अपडेट्स शेअर करत असते.  सोशल मी़डियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: