Home /News /entertainment /

Bigg Boss फेम आदिश वैद्यला लागली लॉटरी, बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर करतोय काम

Bigg Boss फेम आदिश वैद्यला लागली लॉटरी, बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर करतोय काम

Bigg Boss फेम आदिश वैद्यला लागली लॉटरी, बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर करतोय काम

Bigg Boss फेम आदिश वैद्यला लागली लॉटरी, बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर करतोय काम

छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण करुन बिग बॉस ( Bigg Boss) फेम अभिनेता आदिश वैद्य (Adish Vaidya) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं ही माहिती दिलीय.

  मुंबई, 06 जून: 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणारा अभिनेता आदिश वैद्य (Adish Vaidya) फार कमी वेळात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. 'बिग बॉस मराठी सीझन 3' (Bigg Boss  मध्ये आदिश वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून दाखल झाला होता. बिग बॉसमध्ये काहीच काळ राहू शकलेल्या आदिशनं कमी वेळात बिग बॉसच्या घरात सर्वांची मन जिंकली होती. त्यानंतर तो अनेक मालिकांमधून देखील प्रेक्षकांसमोर आला. मराठमोळा आदिश छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण करुन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आदिश लवकरचं बॉलिवूड दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या (Rohit Shetty) सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं शुटींग सुरू झालं असून आदिशनं सेटवरील क्लापबोर्डसह फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' (Indian Police Force) असं आदिशच्या आगामी हिंदी सिनेमाचं नाव आहे. रोहीत शेट्टी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून, सेटवरील काही फोटो आदिशनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आदिशच्या बॉलिवूड एंट्रीच्या बातमीनं त्याचे चाहते भलतेच खुश झालेत. आदिशनं पोस्ट शेअर करत म्हटलंय,  'मी या थ्रीलरचा एक भाग आहे. रोहीत शेट्टीचा सारखा चांगल्या दिग्दर्शकाबरोबर आणि त्याच्या टिमबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला यासाठी मी त्यांचा आभारी आहे.
  रोहीत शेट्टी दिग्दर्शीत आदिश वैद्य अभिनीत 'इंडियन पोलीस फोर्स' हा सिनेमा अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा - राज ठाकरेंच्या आवाजातील दमदार टिझरनंतर 'हर हर महादेव' सिनेमाविषयी मोठी घोषणा; मराठीसह 5 भाषेत होणार प्रदर्शित 5 जूनपासून सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.  आदिशच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत त्याला शुभेच्छा दिल्यात. आदिश गर्लफ्रेंड अभिनेत्री रेवती लेले (Revati Lele) हिनं 'सो प्राऊड ऑफ यू',  म्हणत आदिशला शुभेच्छा देत त्याची पोस्ट शेअर केली आहे. तर आदिशच्या चाहत्यांनी देखील कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्यात.  'ग्रेट गोइंग ब्रो', 'अभिनंदन', 'ऑल द बेस्ट', 'प्राऊड ऑफ यू', अशा कमेंट करत आदिशचं कौतुक केलंय. बिग बॉस मराठीमुळे आदिश महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याआधी आदिशनं 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत आर्चिसची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'तो कुंकू टिकली आणि टॅटू', 'तुमचं आमचं सेम असतं', 'गणपती बाप्पा मोरया', 'जिंदगी नॉट आऊट' या मराठीवरील मालिकेत दमदार भूमिका केली होती.  आदिशनं हिंदी टेलिव्हजनवरही अनेक मालिकेत काम केलं आहे.  'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत आदिश 'मोहीत चव्हाण'च्या भूमिकेत दिसला होता.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या