मुंबई, 22 नोव्हेंबर : ‘बिग बॉस 14’ मध्ये (Bigg Boss 15) सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी(Nikki Tamboli ) . टास्क खेळण्याची पद्धत आणि घरातल्यांसोबत झालेली भांडणं यामुळे निक्की कायम चर्चेत राहिले. विशेष म्हणजे तिच्या याच बिनधास्त अंदाजामुळे तिने अनेकांची मनं जिंकून घेतली. निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. निक्कीने तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. निक्कीने तिच्या सिझलिंग फोटोशूटमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ब्रालेस (Nikki Tamboli Topless Photoshoot) अवतारात तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.
निक्कीच इंस्टाग्रामवर 2.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यांच्यासोबत तिनं तिचे बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या फोटोमध्ये निक्की निऑन पेंटसूटमध्ये थेट कॅमेऱ्याकडे बघत पोज देत आहे. निकीने हे फोटोशूट फिटलुक मासिकाच्या लेटेस्ट कव्हरसाठी केले आहे.
वाचा : 'घाई गडबडीत उलटं ब्लाऊज घातलंस का ?'; आलिया भट्ट कपड्यावरून होतेय ट्रोल
निक्कीने फोटो शेअर करताना एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. ती लिहिते- 'मी लोकप्रिय आहे ही माझी चूक नाही आणि तुम्ही माझ्यावर जळता यात देखील माझी काही चूक नाही.' तिच्या या फोटोशूटवर चाहते कमेंट करत आहेत. तिचा हा बोल्ड अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे.
View this post on Instagram
निक्कीचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून ती महाराष्ट्रीयन आहे.निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996रोजी झाला आहे.मुळची औरंगाबादची असणारी निक्की सध्या मुंबईत राहते.लहानपणापासून निक्की तांबोळीला ग्लॅमर विश्वाकडे कल होता. तिने औरंगाबादमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मॉडेल म्हणून निक्कीने करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. Kanchana 3, Thippara Meesam 2019 आणि Chikati Gadilo Chitha Kotudu या चित्रपटात निक्कीने काम केलं आहे. पण, बिग बॉस 14 मधून तिला खरी ओळख मिळाली, बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर निक्कीचं नाव घराघरात पोहचले . बिग बॉस 14 च्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
वाचा : गोविंदाच्या नावावर सुरू होता हा धक्कादायक प्रकार; समजल्यानंतर घेतला मोठा निर्णय
या शोमध्ये निक्की जान कुमार सानू, रुबिना आणि अभिनव शुक्ला यांच्यासोबतच्या तिच्या चांगल्या संबंधांमुळे देखील चर्चेत होती. यानंतर निक्की तांबोळी दे रोहित शेट्टीच्या स्टंट बेस रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 11 मध्ये देखील सहभागी झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bollywood News, Entertainment, TV serials