Home /News /entertainment /

गौहर खानचा फोटो काढताना पापाराझींकडून घडलं असं काही, भडकली अभिनेत्री, पाहा VIDEO

गौहर खानचा फोटो काढताना पापाराझींकडून घडलं असं काही, भडकली अभिनेत्री, पाहा VIDEO

अभिनेत्री गौहर खानच्या (Actress Gauhar Khan) बाबतीत अशी घटना घडली. यावेळी संतापलेल्या गौहरनं फोटोग्राफर्सना चांगलंच धारेवर धरलं.

     मुंबई, 14 जानेवारी-   बॉलिवूड अभिनेत्रींचे   (Bollywood Actress)  फोटो सोशल मीडियावर   (Social Media)   जोरदार व्हायरल (Viral) होत असतात. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा लूक (Look) पाहण्यासाठी फॅन्सही नेहमीच उत्सुक असतात. या फोटोजची लोकप्रियता पाहता फोटोग्राफर्स   (Photographers)   देखील अभिनेत्रींची सार्वजनिक ठिकाणी (Public Place) अथवा इव्हेंटसमधली (Events) स्टायलिश किंवा सिंपल लूकमधील छबी टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात. अभिनेत्रींचे सार्वजनिक ठिकाणी फोटो शूट करताना काही वेळा विचित्र घटना घडल्याचंही पाहायला मिळतं. अभिनेत्री गौहर खानच्या   (Actress Gauhar Khan) बाबतीत अशीच घटना घडली. यावेळी संतापलेल्या गौहरनं फोटोग्राफर्सना चांगलंच धारेवर धरलं. अभिनेत्री गौहर खाननं मॉडेलिंग क्षेत्रातून (Modelling) करिअरला सुरुवात केली. 2002 मध्ये ती फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. यशराज फिल्म्स च्या `रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द इयर` या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘गेम’, ‘इश्कजादे’, ‘फिवर’, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ आणि ‘बेगम जान’ या चित्रपटांमध्ये तिनं भूमिका साकारल्या. 2013 मध्ये गौहर `बिग बॉस 7` (Big Boss 7) मध्ये सहभागी झाली होती. या सिझनमध्ये ती विजेती ठरली. त्याचप्रमाणे तिनं अनेक टीव्ही शोजमध्येही काम केलं आहे.
    गौहर खान ही सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोज, व्हिडिओंना फॅन्सकडून विशेष पसंती मिळते. सोशल मीडियावर अभिनेत्रींचे विविध लूक्समधील फोटोज नेहमीच व्हायरल होतात. त्यामुळे एखादी अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी दिसली तर फोटोग्राफर्स तिचे फोटो काढण्यासाठी प्रयत्नशील असतात. गुरुवारी गौहर खान एका सार्वजनिक ठिकाणी आली असता, तिचे फोटो शूट करण्यासाठी पापाराझ्झींनी एकच गर्दी केली. गौहर एका दुकानासमोर जात होती, त्याचवेळी फोटोग्राफर्स फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. (हे वाचा:आयुष्मान खुरानानं खरेदी केलं मुंबईत पहिलं घर! किंमत वाचून व्हाल थक्क) यावेळी फोटो काढण्याच्या गडबडीत काही फोटोग्राफर्सचा धक्का दुकानासमोरील कपडे शो करणाऱ्या एका पुतळ्याला लागला आणि पुतळा खाली पडला. या धक्काबुक्कीमुळे गौहर खान जाम संतापली. पुतळा पडल्यानं त्यावरील कपडे खराब झाले होते. त्यामुळे `सीरियसली गाईज`, असं म्हणत, संतापलेल्या गौहरनं फोटोग्राफर्सला सुनावलं. या प्रकारामुळे गौहरचा राग अनावर झाला होता. त्यानंतर तिनं फोटोग्राफर्सला पडलेला पुतळा उचलण्यास सांगितलं. गौहरचं म्हणणं फोटोग्राफर्सनं ऐकलं आणि त्यांनी तो पडलेला पुतळा उचलून होता त्या ठिकाणी ठेवला. या प्रकारानंतर संतापलेली गौहर खान तिच्या गाडीत बसून निघून गेली. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात गौहर खान घडलेल्या प्रकारामुळे फोटोग्राफर्सवर जाम संतापलेली दिसते.
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment

    पुढील बातम्या