तिने 20 वेळा आत्महत्येचा केला प्रयत्न आणि अखेर... रिहॅबमध्ये सापडला Bigg Boss फेम अभिनेत्रीचा मृतदेह

तिने 20 वेळा आत्महत्येचा केला प्रयत्न आणि अखेर... रिहॅबमध्ये सापडला Bigg Boss फेम अभिनेत्रीचा मृतदेह

रविवारी या 29 वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली. तिने रिहॅब सेंटरमध्ये आत्महत्या केली, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.

  • Share this:

बंगळुरू, 27 जानेवारी: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतरही मनोरंजन विश्वातील अनेकांनी अकाली एक्झिट घेतली. रविवारी अभिनेत्री जयश्री रमैया (Jayashree Ramaiah) या 29 वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली. तिने रिहॅब सेंटरमध्ये आत्महत्या केली, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या अहवालात असे समोर आले आहे की या अभिनेत्रीने याआधी 20 वेळा तिचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. बंगळुरूतील एका रिहॅबिलीटेशन सेंटरमध्ये ती डिसेंबर 2020 पासून उपचार घेत होती, मात्र नैराश्याशी असलेली तिची लढाई अखेर संपली आहे. जयश्री एक नवोदित कलाकार होती, तर कन्नडा बिग बॉससाठी (Kannada Big Boss) ती प्रसिद्ध होती. बँगलोर मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

जयश्री तिच्या कुटुंबीयांबरोबर मगदी रोडजवळ राहत असे. या मीडिया अहवालानुसार ही घटना पोलिसांच्या निदर्शनास तेव्हा आली, जेव्हा जयश्रीच्या आईवडिलांनी तिच्याशी बोलण्यासाठी रिहॅबच्या स्टाफशी संपर्क केला. जेव्हा त्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली तेव्हा त्यांना ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. कन्नड इंडस्ट्रीसाठी जयश्रीचा मृत्यू हा एक खूप मोठा धक्का आहे.

(हे वाचा-मुंबईकरांनो, सावधान! तुमच्या कार्डचे होवू शकते क्लोनिंग)

मीडिया अहवालानुसार पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की जयश्रीने याआधी 20 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच ती बरी व्हावी याकरता तिच्या घरच्यांनी तिची रवानगी रिहॅबमध्ये केली होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मध्ये 14 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत घरी देखील परत आली होती. पण पुन्हा तिला उपचारासाठी रिहॅबमध्ये पाठवण्यात आले.

रिहॅब सेंटरमधील स्टाफच्या माहितीनुसार ज्यादिवशी तिचा मृतदेह मिळाला त्या आधीच्या दिवशी तिने संध्याकाळी फक्त चहा प्यायला होता. डाएट करत असल्याचं सांगत तिने रात्रीचं जेवण देखील घेतलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती बाहेरच आली नाही. कुटुबीयांनी स्टाफशी संपर्क केल्यानंतर घडला प्रकार त्यांच्या लक्षात आला.

(हे वाचा-16 महिलांची हत्या करणारा Serial killer गजाआड; तुरुंगातून पळून करीत होता खून)

जयश्रीने काही सँडलवूड फिल्स केल्या आहेत. ती ओळखली जाते ते कन्नडा बिग बॉस सीझन 3 साठी Uppu Huli Khara (2017) मधून तिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 27, 2021, 9:26 AM IST
Tags: suicide

ताज्या बातम्या