Home /News /entertainment /

‘मला माफ कर’ बिग बॉस फेम एजाजने पोस्ट शेयर करत मागितली सिद्धार्थची माफी

‘मला माफ कर’ बिग बॉस फेम एजाजने पोस्ट शेयर करत मागितली सिद्धार्थची माफी

एजाज खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा फोटो शेयर करत, एक भली मोठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई, 5 सप्टेंबर- ‘बिग बॉस 13’(Bigg Boss 13) चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या(Sidharth Shukla) निधनाने फक्त त्याच्या कुटुंबालाचं नव्हे तर त्याच्या मित्रांना आणि चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सिद्धार्थसाठी इमोशनल पोस्ट लिहित आपलं दुख व्यक्त केलं आहे.नुकताच ‘बिग बॉस 14’चा लोकप्रिय स्पर्धक असणारा एजाज खानने(Eijaj Khan) नुकताच सिद्धार्थसाठी लांबलचक पोस्ट (Share Emotional Post) लिहित आपलं दुख व्यक्त केलं आहे. तसेच त्याची माफीदेखील मागितली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Eijaz Khan (@eijazkhan)

  एजाज खानने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा फोटो शेयर करत, एक भली मोठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एजाजने पोस्ट लिहित म्हटलं आहे, ‘मी टोकन गेश्चरवर विश्वास नाही ठेवत. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. जे बोलन अर्धवट राहून गेलं आहे. आता ती गोष्ट कसं सांगू हेच मला समजत नाहीय. सगळ्यात आधी तर मी तुझी माफी मागू इच्छितो. मी तुला फोन करायचा किंवा भेटायचा प्रयत्न नाही केलो. माहिती नाही काय कारण होतं. बहुतेक मी माझ्या कामात व्यग्र होऊन गेलो होतो’, (हे वाचा: Sidharth Shukla प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी गुन्हा नोंदवला, लवकरच मृत्यूचे कार) एजाज पुढे म्हणतो, ‘मला असं वाटत होतं आपली कुठे नं कुठे भेट होईलचं. मात्र आत्ता मी स्वतःला कसं माफ करणार तेच माहिती नाही. ‘बिग बॉसच्या घरातचं मी तुझ्या प्रेमात पडलो होतो भावा. मी आयुष्यात इतक्या जवळून कधीच कोणाचं निरीक्षण केलं नव्हतं. तुझ ते निडरपणे बोलणं, स्वतःचं मत सर्वांना समजावून देणं, तुझं ते प्रत्येक हक्कासाठी लढण, यावरून एक गोष्ट शिकायला मिळाली जिंके पर्यंत हार नाही मानायची’. (हे वाचा: सिद्धार्थच्या जाण्याने असिमला सावरणं कठीण; गर्लफ्रेंड हिमांशीने सांगितली अवस्था) ‘त्या घरात तू एकमेव व्यक्ती होतास, जो मला अगदी चांगल्या प्रकारे समजू शकत होतास. तू जितका मला समजत उमजत होतास तितकं तुझ्यावर प्रेम येत होतं. एका वयानंतर मैत्री करने आणि  त्यासाठी वेळ देणे शक्य होत नाही. मात्र मी नशीबवान आहे. तू मला तुझ्या आयुष्यात सामावून घेतलस. तू माझी प्रेरणा आहेस. तुझी शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवेन. आणि त्याचं मार्गावर चालण्याचा प्रत्यत्न करेन’. अशा पद्धतीने इमोशनल पोस्ट लिहून एजाजने सिद्धार्थवरचं आपलं प्रेम, आपलं दुख व्यक्त केलं आहे. सध्या एजाजची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. अनेक कलाकार यावर इमोशनल कमेंट्स करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  पुढील बातम्या