Home /News /entertainment /

Bigg Boss च्या जुन्या स्पर्धकाला BB OTT साठी मिळाली होती 'न्यूड योगा'ची ऑफर!

Bigg Boss च्या जुन्या स्पर्धकाला BB OTT साठी मिळाली होती 'न्यूड योगा'ची ऑफर!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) सध्या नव्या अंदाजात दिसणार आहे. ‘बिग बॉस 15’ 6 आठवडे आधी OTT वर रिलीज होणार आहे.

    मुंबई, 31 जुलै- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) सध्या नव्या अंदाजात दिसणार आहे. ‘बिग बॉस 15’ 6 आठवडे आधी OTT वर रिलीज होणार आहे. त्यांनतर हा शो टीव्हीवर शिफ्ट केला जाणार आहे. OTT वर करण जोहर या शोचं होस्टिंग करताना दिसणार आहे. तर टीव्हीवर सलमान खान. ‘बिग बॉस OTT’ (Bigg Boss OTT) साठी मेकर्सनी बिग बॉसचा जुना स्पर्धक (Ex Contestant) आणि न्यूड योगा गुरु (Naked Yoga Guru) विवेक मिश्राला (Vivek Mishra) अप्रोच केलं आहे. नुकताच त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे. मेकर्सनी त्याला ‘बिग बॉस OTT’ मध्ये सेमी न्यूड योगचा तडका लावण्यास सांगितलं होतं. मात्र त्याने या मागणीला नकार दिला आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विवेक मिश्राने म्हटलं आहे, ‘मला मेकर्सनी ‘बिग बॉस OTT’ ची ऑफर दिली होती. त्यांना या शोला रंजक बनवायचं आहे. त्यामुळे त्यांनी मला न्यूड किंवा सेमी न्यूड योगा करण्याची मागणी केली होती. हे ऐकून मलाही आश्चर्य वाटलं होतं. मात्र मी त्यांना नकार दिला आहे. तसेच मेकर्स 5 जुन्या स्पर्धकांच्या शोधात आहेत. कारण त्यांना यामध्ये आणखी मसाला आणायचा आहे’. (हे वाचा:Big Boss15 : भिडेंची सोनू दिसणार बिग बॉसच्या घरात; तारक मेहतानंतर नव्या शोसाठी स ) तसेच त्याने पुढे म्हटलं की, ‘मी अशा एका मोठ्या रिएलिटी शोमध्ये फक्त मसाला आणण्यासाठी न्यूड योगा का करेन? मी खुपचं सेक्सी आहे. आणि मी त्या प्रकारचे योगा करण्यासाठी खुपचं मोठी रक्कमसुद्धा घेतो. त्यांच्या मागणीवर मी त्यांना स्पष्ट केलं, की मी एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये घेईन. तसेच त्याने म्हटलं की, मी स्टारलेट नाही किंवा मी फक्त न्यूड योगगुरु म्हणून शोमध्ये दिसू इच्छित नाही’. (हे वाचा: गौहरला जैदने लग्न कॅन्सल करण्याची दिली होती धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा) पुढे त्याने म्हटलं, की ‘मी नको उद्देशासाठी असे शो करण्यापेक्षा कॉलिटी आणि चांगल्या कन्टेन्टचे शो करने पसंत करेन. कोणताही शो हा होस्टवर नाही चालत. मग तो सलमान खान असो करण जोहर किंवा जेनेफर लोपेज. त्यांचं योगदान नसतं असं नाही. मात्र जेव्हा स्पर्धक आणि कन्टेन्ट चांगला असतो तेव्हा शोला जास्त प्रसिद्धी मिळते’.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Karan Johar, Salman khan, Tv shows

    पुढील बातम्या